Take a fresh look at your lifestyle.

विषाचे कांदे वाटुन रस पिल्यावर अमर होता येईल का?

संसारात विषाच्या कांद्याची खरेदी होते.

ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रसु घेईजे पिळुनी । तया नाम अमृत ठेवुनी । जैसें अमर होणें ॥ ४९८ ॥
अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल, तो पिळून घ्य़ावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून (त्याच्या सेवनाने) ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी. एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट याचा बोध अनेकदा वेळेवर होत नाही. अमर होण्याच्या इच्छेने जर कुणी विषारी कांदे वाटुन त्याचा रस पिला तर काय होईल?मृत्यू निश्चित आहे. हे सरळ सरळ उदाहरण माऊली देतात पण संसारात असे कांदे कुठे मिळतात?त्यामागचा गर्भितार्थ वेगळा आहे.

जो बहुवें विषयविलासें गुंफे । तो म्हणती उवाईं पडिला सापें । जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥ ५०९ ॥
जो पुष्कळ विषयविलासात निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात व जो लोभाने ग्रस्त झाला आहे त्यास या जगात ज्ञानी म्हणतात.पण वास्तविक भोगविलास हेच विषाचे कांदे आहेत.त्याचं सेवन मनुष्य करत असतो आणि हेच माझ्या हिताचं आहे असं म्हणत असतो.ऐशारामात जगणारी माणसं,कष्ट सोडून जगणारी माणसं विकारग्रस्थ होतात.शरिराचे लाड पुरवणे म्हणजे विषाचे सेवन आहे पण ते त्याला अत्यंत प्रिय वाटते.पतंग दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतो.तो त्याच्यावर झेपावला की त्याला अचुक मरण येते.
पतंगा दिपी अलिंगन।तेथ त्यास अचूक मरण।तेवी विषयाचरण।आत्मघात।। आपल्या जिभेवर ताबा मिळवता आला तर यातून बाहेर पडणे शक्य आहे.

जीते सर्वम रसना जिंके। असं म्हटलं जातं.ज्याला जिभेला जिंकता आलं त्याला सर्व जिंकता येईल. पाच विषयामधे रस नावाचा विषय जिभेशी संबंधित आहे. यामुळे शरीर विकारांकडे जाते.एखाद्याला खूप गोड खाण्याची आवड असते त्याने शर्करेचे प्रमाण शरीरात वाढत जाते आणि मग त्याचे भोग आयुष्यभर भोगावे.लागतात.हे एक उदाहरण आपण सर्रास पहातो.इतर चार विषयही याहून भयंकर आहेत.ज्यामुळे पुर्णायुष्य आनंदाने जगता येत नाही. हे विषाचे कांदे आहेत. आपण यिवर विचार केला तर थोडाबहुत फरक नक्कीच पडेल.
रामकृष्णहरी