Take a fresh look at your lifestyle.

कोरोना : पारनेर तालुक्यातील ‘ही’ गावे बंद करण्याचे आदेश !

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेचे पोस्टमार्टम.

पारनेर : तालुक्यातील भाळवणी, ढवळपुरी, वडनेर बुद्रुक, निघोज,कान्हुर पठार ,दैठणे गुंजाळ,वडगाव सावताळ, जामगाव ,रांधे, पठारवाडी, कर्जुले हर्या, वासुंदे या प्रमुख गावांसह सर्व गावातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तीन ऑक्टोबर पर्यंत ही १२ गावे बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने काढले असून कोरोना समितीस नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने या गावात कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही सूचित करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता पारनेर तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता पारनेर तालुक्यातील १२ गावे बंद करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत.
मंगळवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पारनेर तालुक्यातील पारनेर ग्रामीण रुग्णालयासह टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालय व कान्हुर पठार प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. कोरोनाच्या तिसरा लाटेच्या संभाव्य पार्श्वभूमीवर पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे १०० बेडचे ऑक्सिजन सेंटर सुरु करण्याचे सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी दिली आहे तर दुसरीकडे याच ग्रामीण रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांवर सुद्धा उपचार करण्यात यावे यासाठी पण इतर विभाग कार्यान्वित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पारनेर शहरातील असणारे पूर्णवाद भवन येथील कोरोना सेंटर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले,जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा, नायब तहसीलदार गणेश आधारी,गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे,गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या
सह सरपंच अरुण खिलारी, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडूंगे, किरण तराळ, बापूसाहेब रांधवन, ग्रामविकास अधिकारी रोहिणी तरवडे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान पारनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पारनेर तालुक्यातील अनेक गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ग्रामपंचायत पातळीवर कोरोना समिती कार्यरत आहे. त्यांना कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश गावातील कोरोना समितीला दिले आहेत. गावातील कोरोना रुग्णांना घरामध्ये उपचार न करता त्यांना सेंटरमध्ये दाखल करून उपचार करावे अशा सक्त सूचनाही समितीने दिलेली आहे.कोरोना रुग्णांची संपर्कात ज्या व्यक्ती असतील त्यांची तपासणी करण्याचे आदेश यावेळी स्थानिक कमिटीला विभागीय आयुक्तांनी दिले आहे.
पारनेर व टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात अपुरी कर्मचारी संख्या व आरोग्य सोयी सुविधांचा असणारा अभाव यासंदर्भात रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. बाळासाहेब कावरे व शरद झावरे यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे तक्रारी मांडल्या. ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब व गरजू रुग्णांना जर या रुग्णालयाचा फायदा नसेल तर काय उपयोग असा सवाल यावेळी करण्यात आला. तर या दोन्ही रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीसह इतर कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे यावेळी करण्यात आली.