Take a fresh look at your lifestyle.

स्वातंत्र्यानंतर हिवरे कोरडाला पहिल्यांदाच साजरी झाली विकास कामांची ‘दिवाळी’ !

आमदार निलेश लंकेंच्या हस्ते २ कोटी ७७ लाख २३ हजार विविध विकास कामांचा उद्घाटन

पारनेर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून हिवरे कोरडा हे गाव विकासापासून वंचित होते परंतु स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या गावाला सरपंच,उपसरपंच व कार्यकर्ते ग्रामस्थांच्या मागणीनुसार निधी दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी सांगितले. तर या पुढील काळात सुद्धा हिवरे कोरडा व परिसरातील गावातील विकासाचा अनुशेष
भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
आमदार निलेश लंके यांच्या हस्ते हिवरे कोरडात २ कोटी ७७ लाख २३ हजार विविध विकास कामांचा उद्घाटन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर उपसभापती सुनंदाताई धुरपते,उद्योजक सुरेशशेठ धुरपते, चेअरमन बाळासाहेब कोरडे,सरपंच सौ. उज्वला कोरडे ,उपसरपंच सौ.सपना अडसूळ, ग्रामपंचायत सदस्य सुदाम कोरडे , सैनिक बँकेचे व्यवस्थापक संजय कोरडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ कोरडे, उद्योजक दिलीप कोरडे, उद्योजक दादा गोळे, अॅड राहुल झावरे , बापू शिर्के,गंगा कोरडे,बाळासाहेब कोरडे, बाबू कोरडे, रोहिणी वाळुंज घंगाळे, संभाजी रोहोकले, मच्छिंद्र वाळुंज ,विकास वाळुंज ,बबन अडसूळ, सुरेश धुरपते, किरण ठुबे, सालके , भागाजी खरमाळे , प्रसाद नवले चंद्रभान ठुबे, अभयसिंह नांगरे ,अण्णा सिनारे ,बाळासाहेब कावरे , संजय जऱ्हाड , भास्कर अडसूळ संजय जऱ्हाड आदी. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की, हिवरे कोरडा ग्रामस्थांना माणसांची पारख आहे, त्यांचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे, ग्रामपंचायत स्थापने पासून1952 पासून आत्तापर्यंत एवढा मोठा निधी आला नाही, विशेष म्हणजे हिवरेकरांना काम कसे करून घ्यायचे ही चांगलीच माहित आहे, पुढील टप्प्यात अजून निधी आणणार आहे कोरोना काळात न घाबरता एवढी मोठी कामे झाली विकासाच्या कामाचा धडका चालू होता ,विकासाची गंगा घराघरांमध्ये पोहोचल्याचेही आ. लंके यांनी सांगितले.

यावेळी सरपंच सौ.उज्वला कोरडे यांनी मळगंगा सुवासिनी कक्ष , व्यायामशाळा , विविध सेवा संस्थेचे कार्यालय या कामांची मागणी केली, आमदार लंके यांनी लवकरच हे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून गावामध्ये रस्ते, पाणी,शिक्षण व इतर सोयी सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी मात्र जवळपास तीन कोटी रुपयांच्यावर निधी देऊन अंधारात पडलेलं गाव उजेडात आणले.
सौ.उज्वला दत्ता कोरडे
सरपंच,हिवरे कोरडा