Take a fresh look at your lifestyle.

म्हणून इंदूरीकर महाराजांचे कीर्तन झाले ८० टक्के डिलीट !

तृप्ती देसाईंनी केला असा दावा.

 

मुंबई : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी एका कीर्तनात सम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, आणि विषम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी भूमाचा ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदूरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा तृप्ती देसाईंनी इंदोरीकरांविरोधात वक्तव्य केलं आहे.
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील, मीनल शाह, सुरेखा कुडची आणि तृप्ती देसाईसुद्धा आहेत. बिग बॉसमध्ये शिवलीला पाटील, मीनल शाह आणि सुरेखा कुडची बोलत असतात. त्यावेळी शिवलीला म्हणतात की, या तृप्ती देसाई यांनी इंदोरीकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मी पुराव्यांच्या आधारे कीर्तन सांगत असल्याचं त्यांनी सांगितलं.
हे ऐकून तृप्ती देसाई म्हणतात, इंदूरीकरांची बरीच कीर्तन ही महिलांचा अपमान करणारी होती, आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. आमच्या आंदोलनानंतर त्यांची अनेक कीर्तन यु ट्यूबवरून डीलीट करण्यात आलीत. त्यानंतर शिवलीला म्हणतात की, त्यावेळी अनेक कीर्तनकारांनी आपली कीर्तन डीलीट केली होती.
दरम्यान, त्यावेळी आम्ही मोहिम चालवली होती कारण संपुर्ण जिल्हा माझ्याविरोधात उभा होता, मी जाणार म्हटल्यावर 100 किमी अलिकडे मला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, असे तृप्ती देसाई यांनी सांगितलं. बिग बॉसच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यावेळच्या देसाई आणि इंदूरीकरांमधील संघर्ष आठवला.