Take a fresh look at your lifestyle.

पारनेर सैनिक बँकेला १ कोटी ९० लाखाचा नफा.

अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे यांची माहिती.

पारनेर : तालुका सैनिक सहकारी बॅँकेला मार्च-२०२२ अखेर १ कोटी ९० लाखांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे यांनी दिली.
बँकेचे कार्यक्षेत्र अहमदनगर, पुणे ,ठाणे, नाशिक,औरंगाबाद, बीड,व सोलापूर असे ७जिल्ह्याचे असून बँकेच्या पारनेर,श्रीगोंदा, कर्जत,जामखेड या ४ शाखा कार्यरत आहेत. या फक्त चार शाखा मधून १३२ कोटीच्यावर ठेवी ठेवत ठेवीदारांनी बँक प्रति विश्वास दाखवला आहे. बँकेतील एकूण ठेवी १३२ कोटी व कर्ज वाटप ९७ कोटी असून बँकेची गुंतवणूक ४० कोटी आहे.

व भागभांडवल ५ कोटी ६७ लाख आहे.ढोबळ नफा १ कोटी ९० लाख इतका झाला आहे तर सर्व तरतुदी वजा करून १ कोटी १३ लाख इतका निव्वळ नफा झाला असल्याचे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे यांनी सांगितले.
बँक कार्यक्षेत्रातील ज्या चार शाखा आहेत त्या-त्या शाखेत गरजवंतांना कर्ज पुरवठा करण्यात बँक अग्रेसर राहिली आहे.बँकेने आरटीजीएस,

एनएफटी,सी टी एस चेक क्लेरिंग,एस एम एस सुविधा सह अन्य अद्ययावत सुविधा सुरु ठेवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्याचा उपयोग होत आहे. ‘बँकेच्या आर्थिक प्रगतीमध्ये सभासद, ठेवीदार, कर्जदार, सहकारी संचालक व कर्मचारी यांचे सामुदायिक योगदान असल्याचे बँकेचे उपाध्यक्ष भिमाजी साठे यांनी सांगितले.