Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 08 एप्रिल 2022

▪️मेष : कामात स्त्रियांची मदत घ्याल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. घरातील गोष्टीत अधिक लक्ष घाला. नवीन मित्र जोडाल.
▪️वृषभ : संयम बाळगावा लागेल. प्रलोभनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. वैचारिक स्थिरता ठेवावी. प्रवासात काळजी घ्यावी.
▪️मिथुन : शांतपणे विचार मांडावेत. भौतिक गोष्टींचा फार विचार करू नका. अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराचे वर्चस्व राहील.

▪️कर्क : अंगातील जोम वाढेल. काही कामे विनासायास पार पडतील. मुलांचा व्रात्यपणा वाढेल. मैदानी खेळ खेळाल.
▪️सिंह : लेखनाला चांगला उठाव मिळेल. लबाड लोकांपासून दूर राहावे. शैक्षणिक कामे पार पडतील. गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल.
▪️कन्या : संभाषण कौशल्य दाखवता येईल. मित्रांचा गोतावळा जमवाल. नातेवाईकांची गाठ पडेल. गप्पांची आवड पूर्ण कराल.

▪️तूळ : योग्य परीक्षण करावे लागेल. उत्तम लिखाण करता येईल. ज्ञानात भर पडेल. सतत काहीनाकाही विचार करत राहाल.
▪️वृश्चिक : सर्वांशी लाघवीपणे बोलाल. चिकाटी सोडू नका. जुनी कामे डोकेवर काढतील. बौद्धिक दृष्टीने विचार मांडाल.
▪️धनु : अति चिकित्सा करू नका. कामात तत्परता दाखवावी. हजरजबाबीपणा दाखवाल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल.

▪️मकर : आपल्याच मतावर आग्रही राहू नका. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. धार्मिक गोष्टीत लक्ष घालाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
▪️कुंभ : मोठ्या लोकांमध्ये उठबस वाढेल. दिवस मानाजोगा जाईल. लहनांशी मैत्री कराल. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल.
▪️मीन : पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. व्यवहार चातुर्य दाखवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. कल्पकतेने विचार कराल.