Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸7 एप्रिल 2022

 

▪️मेष : काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. बदलाला अनुसरून वागावे. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात.
▪️वृषभ : भागीदारीत अधिक लक्ष घालावे. नवीन वस्त्र खरेदी कराल. कामाचे योग्य नियोजन करावे. उगाच विरोध करत बसू नका.
▪️मिथुन : आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. चांगले औद्योगिक वातावरण लाभेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.
▪️कर्क : लिखाणात चांगली प्रगती करता येईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जोडीदाराच्या स्वभावाची नवीन बाजू लक्षात येईल. मानसिक दोलायमानता जाणवेल.
▪️सिंह : पैज जिंकता येईल. धाडसाने कामे हाती घ्याल. मुलांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो.
▪️कन्या : प्रेमसौख्याला बहर येईल. उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. आकर्षणाला बळी पडू नका.
▪️तूळ : लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. नातेवाईकांची मदत घेता येईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. दिवस काहीसा आळसात जाईल.
▪️वृश्चिक : जुगारातून लाभ संभवतो. निसर्ग सौंदर्यात रमून जाल. छंद जोपासायला वेळ काढता येईल. गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल.
▪️धनू : कामाची लगबग राहील. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. उष्णतेचे विकार जाणवतील. प्रवासात काहीसा त्रास संभवतो.
▪️मकर : दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणात सध्या अडकू नका. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. धार्मिक कामात सहभाग घ्याल.
▪️कुंभ : मदत करतांना मागे-पुढे पाहू नका. निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. जवळचा प्रवास घडेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
▪️मीन : शांत व विचारी निर्णय घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. बौद्धिक चलाखी दाखवाल.