Take a fresh look at your lifestyle.

खरे अध्यात्म आणि परमार्थ !

अनूभुती शिवाय वृत्ती बदलत नाही.

युवकांनो अध्यात्मिक आणि परमार्थिक झाल्याशिवाय माणूस म्हणून जगणं अशक्य आहे.
पण मग तुमच्यासमोर जे अध्यात्मिक जीवन जगणारी,परमार्थिक माणसं आहेत,ते पाहून तुमची ते स्विकारण्याची अजिबात इच्छा नाही. असच मत आहेना तुमचं?
पोथी वाचणं,भजन करणं,किर्तन करणं,सत्संग करणं, वाऱ्या करणं,देवळात जाणं,नैवेद्य दाखवणं,मंदिरं बांधणं,गंधटिळा लावणं,माळा घालणं,विशिष्ट वस्र धारण करणं हेच अध्यात्मिक आणि परमार्थिक जीवन जगणारी माणसं तुम्ही तुमच्या अवतीभवती पहाता,आणि यातील बहुतांश माणसं विरुद्ध आचरण करताना आपल्या निदर्शनास येतं.आणि मग तुम्ही म्हणता,”नकोरे बाबा तो परमार्थ आणि ते अध्यात्म”.
वास्तविक परमार्थ बाहेरून दिसत असला तरी अध्यात्मात बाहेरून दाखवण्यासारखं काहीच नाही. मनानं आत्म्याशी केलेला संवाद आहे.त्यातून मिळालेलं ज्ञान,सत्याची अनुभूती येऊन तयार झालेली वृत्ती समाजोद्धारासाठी कामी यायला हवी.हेच त्याचं शेवटचं चरण आहे.अनुभूती शिवाय वृत्ती बदलत नाही. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असले तरी अनुभुतीत फार फरक नसतो.थोड्याफार फरकाने ती सारखीच असते.त्यामुळे परमार्थात काही बाबी खटकत असल्या तरी तिकडे फार लक्ष देण्यापेक्षा अध्यात्मिक ज्ञानावरच सगळे लक्ष केंद्रित केले असता अनुभवास आलेले ज्ञान अदभूत असते.त्याने दृढ विश्वास तयार होतो.मनातले विकल्प गळुन पडतात.या सगळ्याचा परिणाम आपल्या आचरणावर होत असतो.
रामकृष्णहरी