Take a fresh look at your lifestyle.

आजचे 12 राशींचे राशिभविष्य

6 एप्रिल 2022

 

मेष : मनमोकळ्या स्वभावाचे दर्शन घडवाल. कौटुंबिक कामात दिवस जाईल. मानसिक ताण जाणवेल. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल.
वृषभ : मानसिक चांचल्य जाणवेल. नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल. उगाचच त्रागा करू नका. मनातील नसती भीती दूर सारावी.
मिथुन : व्यावसायिक कमाईकडे लक्ष द्यावे. आवाजात गोडवा ठेवावा. वैवाहिक सौख्याकडे लक्ष ठेवावे. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.
कर्क : बौद्धिक चलाखी दाखवावी. वागण्या-बोलण्यात सज्जनपणा ठेवाल. भावनाशीलता वाढू शकते. चटकन निराश होऊ नका.
सिंह : जोडीदाराची प्राप्ती वाढेल. तुमच्या संपर्कातील लोकात भर पडेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नैराश्याला दूर सारावे. प्रवासात सतर्कता बाळगावी.
कन्या : कामात काहीशी चालढकल कराल. पैज जिंकता येईल. स्त्री समूहात वावराल. सुखासक्तपणा जाणवेल.
तूळ : कामात वारंवार बदल करू नका. आपला दर्जा टिकवण्याचा प्रयत्न कराल. चौकसपणा दाखवाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल.
वृश्चिक : घरातील कामात अडकून पडल्यासारखे वाटेल. शब्द जपून वापरावे लागतील. गुंतवणुकीत फसगत होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत.
धनू : डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. गैरसमजातून वाद वाढू देऊ नका. क्षुल्लक कारणांनी खिळून पडल्यासारखे वाटेल.
मकर : मानसिक स्वास्थ्य जपावे. स्त्री वर्गापासून दूर राहावे. कोर्ट कचेर्‍यांची कामे त्रासदायक ठरू शकतात. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल.
कुंभ : कष्टाला मागे पुढे पाहू नका. मित्र मंडळींशी सलोखा ठेवावा लागेल. मानापमानात अडकून पडू नका. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील.
मीन : काही अनपेक्षित बदल दिसून येतील. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामाचे योग्य नियोजन करावे लागेल. विरोधकांच्या कारवाया वाढू शकतात.