Take a fresh look at your lifestyle.

यश अपकीर्ती ही आत्मत्त्वाचीच निशाणी आहे !

परतत्वापासुनच आत्मत्त्वाची निर्मिती होते.

 

सत्याच्या लढ्यात येणारे यश,अपयश अथवा अपकीर्ती ही माझीच रुपे आहेत असा संदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत.
अगा यश अपकीर्ती । हे जे भाव सर्वत्र दिसती । ते मजचि पासूनि होती । भूतांचिया ठायीं ॥ ८६ ॥
दान, यश व दुष्कीर्ती, हे जे विकार सर्व ठिकाणी रहातात ते माझ्यापासून प्राण्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात.पण याची समज बहुधा सामान्य जीवाला नसते.यश आले की ते मी मिळवले आहे आणि अपयशाने अपकीर्ती आली की मग मात्र त्याचं खापर आपण कुणावर तरी फोडण्याची तयारी करतो.वास्तविक या दोहोंचाही कर्ता करविता मी आहे असं भगवंत म्हणतात,व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे आपण जाणतोच.मनात वेगवेगळ्या प्रकारचे भाव निर्माण होतात.
जैसीं भूतें आहाति सिनानीं । तैसेचि हेही वेगळाले मानीं । एक उपजती माझ्या ज्ञानीं । एक नेणती मातें ॥ ८७ ॥जशी भूते वेगवेगळाली आहेत तसेच हे भाव वेगवेगळे आहेत. असे समज. त्यापैकी कित्येक भाव माझ्या ज्ञानात उत्पन्न होतात व कित्येक मला जाणत नाहीत.माझ्या अज्ञानात उत्पन्न होतात,असं भगवंत म्हणतात. पण आपण हे मान्यच करत नाही. कारण प्रवृत्तीने निर्माण झालेला स्वभाव हे त्याचं मुळ आहे. त्याचं उदाहरण देताना श्रीकृष्णांनी सुंदर दाखला दिलाआहे.
प्रकाशु आणि कडवसें । हें सूर्याचिस्तव जैसें । प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तुसीं ॥ ८८ ॥
अरे अर्जुना, प्रकाश व अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनही ते ज्याप्रमाणे एका सूर्यापासूनच होतात, सूर्याच्या उदयात प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या अस्ताबरोबर अंधार होतो. ॥१०-८८॥
आणि माझें जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवाचें करणें । म्हणौनि भूतीं भावाचें होणें । विषम पडे ॥ ८९ ॥आणि माझे जे ज्ञान होणे अथवा माझे जे अज्ञान असणे, हे प्राण्यांच्या दैवाचे कर्तृत्व आहे, म्हणून प्राणिमात्रांच्या ठिकाणी कमीजास्त प्रमाणात ह्या विकारास व्हावे लागते.
सज्जनहो जाणीव हाच भगवंत आहे असं अनेकदा म्हटलं जातं.अंधार आणि प्रकाशाचं कारण सुर्य आहे. तसं भगवंताच्या ज्ञानाने आणि अज्ञानानेच सम आणि विरुद्ध घटना घडत असतात.मनुष्य मात्र अपयशाने जळत रहातो.वास्तविक परतत्वापासुनच आत्मत्त्वाची निर्माती आहे. आपण केवळ आपल्यापुरता विचार करतो.त्याच कारणाने आनंद,दुःख होते.
आजारी पडणे अथवा न पडणे आपल्या हातात नाही हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. कोरोणा काळात खूप काळजी घेऊनही माणसं आजारी पडली.हे सत्य आपण स्विकारायला तयार नाही.जी माणसं आजारी पडली नाही त्यांच्यात हा भाव दृढ झाला की मी स्वतःला जपले म्हणुन वाचलो.पण सत्य तसे नाही. ही सांगड आत्मतत्वाशी निगडित आहे.फुटपाथवर रहाणारी माणसं कुठलीही काळजी घेणारी यंत्रणा उपलब्ध नसताना ठणठणीत राहिली,याला तुम्ही काय म्हणाल?
रामकृष्णहरी