Take a fresh look at your lifestyle.

आपलाच आपण नव्याने शोध घ्यावा !

युवकांनो हे तुमच्यासाठी आहे.

मित्रहो,आपण “मी कसा आहे?” यावर चिंतन केले पाहिजे.याचं कारण असं की माणसांचे विचार, चलनवलन बाहेरून आत प्रक्षेपित होत असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर चित्रपट पाहून एखाद्या हिरोची स्टाईल करणं,एखाद्या वक्त्याची बोलण्याची ढब उचलणं,एखाद्या लोकप्रिय व्यक्तिचा बंगला,गाडी पाहून तसचं निर्माण करण्याचा प्रयत्न,एखाद्याचा चांगला चाललेला व्यवसाय पाहून आपणही तोच करणं,एखाद्याची नोकरीतली मिजास पाहून आपणही ती नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणं. माणसं आपापल्या कुवतीनुसार हे नकली,दुस्तर जीवन कळतनकळत जगत असतात.
बाहेरून आत म्हणजे आपल्यात प्रक्षेपित होणारे विचार शक्यतो कायम टिकतीलच असं नाही. ते त्या काळापुरते टिकतात. पुढे आणखी कुणाचे विचार आपण स्विकारतो.आपणच ज्यागोष्टी स्विकारल्या,त्या पुढे जाऊन चुकीच्या वाटु लागतात. किंवा ज्यागोष्टी नाकारल्या त्यापुढे जाऊन आपण चुकीचे वागलो असे वाटु लागते.बहुतांश माणसं असच जीवन जगतात, म्हणून ती माणसं गर्दीचा हिस्सा बनुन रहातात.
स्वतःला व्यक्त न करणं म्हणजे भाऊगर्दीचा भाग होणं आहे. वेगळ्या वाटेने जाण्याची हिम्मत अशा माणसांमधे नसतेच.परंपरेने आलेले पुढे कोणतीही प्रगती न करता चालवित रहाणं,चाकोरीबद्ध जीवन जगणं हे मृतप्रायच जीवन आहे. आपण आपल जीवन कसं जगता आहात?
मी कसा आहे? या जगात मी कोण आहे? कधी काळी ‘कोहंम्?’ला ‘अहं ब्रह्माास्मी’ असे उत्तर देऊन पारलौकिकवादी माणूस स्वत:चे खोटे समाधान करून घ्यायचा. पण खरंच माणसाचे या विश्वात काय स्थान आहे?
बुद्घ म्हणाले होते, माणसाचा विचार करायचा तर या विश्वाच्या भव्य अवकाशांचा विचार करायला हवा. माणसाचं जगणं, त्याची मूलतत्त्वे आणि प्रत्यक्ष अवकाश जाणून घ्यायला हवे. बुद्घ तत्त्वज्ञान, मानवी शक्ती आणि जीवन व्यवहार या संदर्भात माणूस खूप लहान आहे, असे मानते. वस्तुत: इतर प्राण्यांप्रमाणेच माणूस आहे. परंतु त्याच्या जवळ असलेली बुद्घिमत्ता या बळावर तो स्वत:चे असे वेगळे विश्व निर्माण करतो
यावर आपण विचार केलाच असेल,नसेल केला तर नव्याने करावा.हा विषय आपण अत्यंत गमतीजमतीने हाताळावा.कुणाचाही दोष दाखवण्याचा उद्देश नाही. कारण या विश्वात निर्दोष मनुष्य सापडणं केवळ अशक्य आहे.म्हणून फार चिंता करण्याचं कारण नाही. याठिकाणी आपण कुटुंबासाठी काही गोष्टी बदलु शकलो तर एक वेगळं जीवन जगण्याची मजा मिळणार आहे. नव्यानं जग दिसणार आहे.
रामकृष्णहरी