तुकोबारायांनी गाथा आपला माथा ठिकाणावर येण्यासाठीच लिहला आहे. आपण नेमकं कसं वागावं?कसं वागु नये,याचं इत्यंभूत आणि अचुक मार्गदर्शन त्यांनी केलं आहे.आपल्याला त्याची गरज वाटत नाही हेच आपलं दुर्दैव आहे. मुळात आयुष्य तरी किती आहे?यावर फार बोलाण्याची गरज वाटत नाही कारण आयुष्य सोडून सगळं आम्ही व्यवहाराशी जोडायला तयार आहोत.वयाच्या ढोबळ आकडेवारीतच आम्ही धन्यता मानतो. पण खरंच आपल्या आयुष्याइतके आपण जगलो आहोत का?हा काय प्रश्न आहे का?वय आहे तेवढं आम्ही जगलोच आहोत,असं ठासून सांगु आम्ही. पण ते अजिबात खरं नाही. कारण तुकोबारायच तसं म्हणतात,