Take a fresh look at your lifestyle.

किरीट सोमय्यांनी हवेत गोळीबार करू नये !

अॅड.सौ.शारदाताई लगड यांचा सल्ला.

 

 

अहमदनगर : गेले तीन चार दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप करुन त्यांच्यासह महाविकास आघाडी सरकारची बदनामी केली आहे.ज्या लोकांना सवंग प्रसिद्धीची सवय झाली आहे ते असे बेछुट आरोप करत आहे.तेंव्हा या किरीट सोमय्या महाशयांनी हवेत गोळीबार करू नये असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा अॅड.सौ.शारदाताई लगड यांनी केले आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या चालविलेल्या बदनामीप्रकरणी अॅड. लगड यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.अनेक रथीमहारथींनी शरद पवार यांच्यावर आरोप केले होते परंतु त्यांचा एकही आरोप त्यांना शाबीत करता आला. उलट तुम्ही शरद पवार यांचा आदर्श घेऊन समाजात कसं वागल पाहिजे हे शिकवून घ्या असा सल्लाही अॅड. लगड यांनी निवेदनात दिला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री महोदयांना ईडीची भीती दाखवू शकत नाही .ईडी काय तुम्हाला तुमचे घरची मालमत्ता वाटते का? असा सवाल करीत उठसुठ ईडीचा बागुलबुवा दाखवायचा. आपण बेछुट आरोप करणे थांबवावे अन्यथा आपल्या विरुद्ध आम्हाला नगर जिल्ह्यात तुमच्या विरोधात फौजदारी कारवाई करणे भाग पडेल असा इशाराही अॅड.शारदाताई लगड यांनी दिला आहे.