Take a fresh look at your lifestyle.

झोप पूर्ण झाली नाही तर…

आरोग्यावर काय परिणाम होतात?

निरोगी आरोग्यासाठी प्रौढ व्यक्तीने साधारणत: सात ते आठ तास (वयानुसार तासांमध्ये बदल होतो) घेण्याची आवश्यकता असते. कारण पुरेशा झोपेमुळे शरीराला आणि मेंदूला आराम मिळतो. मात्र कमी झोप घेतल्यामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
कमी झोप घेण्याचे परिणाम काय? वाचा…
● रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम.
● कॅन्सर आणि अल्झायमरसारखे आजार होण्याची शक्यता.
● मधूमेह होण्याची शक्यता.
● हृदयरोग होण्याची शक्यता.
● कोणत्याही कामात लक्ष केंद्रित होत नाही.
● वजन जास्त वाढते.
● शरीरातलं ग्रेलिन हार्मोनचं प्रमाण वाढतं.
● जास्त आजारी पडतात.

● डोळ्यावर सुद्धा परिणाम होतो.
● ताणतणाव, रागीटपणा, चिडचिडेपणा दिसून येतो.
● हायपरटेंशनची समस्या निर्माण होते.
हल्ली अनेक लोक कमी झोपेमुळे विविध प्रकारच्या आजाराने त्रस्त आहेत. कमी झोप आणि तणाव यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि निरोगी रहा…
टीप : वरील लेखात देण्यात आलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे.