Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून एखाद्याच्या मृत्यूनंतर RIP म्हटलं जातं!

सविस्तर माहिती जाणून घ्या.

एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर ‘RIP’ शब्द वापरल्याचे तुम्ही पहिले असेल. RIP हे शॉर्ट फॉर्म असले तरी, ते एखाद्या शब्दासारखे वापरले जात आहे. मात्र अनेकांना याचा नेमका अर्थ आणि फुल फॉर्म देखील माहीत नाही. चला, तर याबाबत अधिक सविस्तर या लेखामध्ये जाणून घेऊयात…
● ‘Rip’ चा अर्थ कापणे असा होता.
● हे एक Acronym आहे. याचा फुल फॉर्म ‘Rest In Peace’ असा आहे.
● Rest In Peace ची उत्पत्ती लॅटिन फ्रेज ‘Requiescat In Pace’ पासून झाली आहे.
● Requiescat In Pace चा अर्थ ‘शांतपणे झोपणे’, असा होतो.
● मराठीमध्ये याचा संदर्भ ‘आत्म्याला शांती लाभो’ असा आहे.
● ख्रिश्चन धर्मात मानले जाते की, मृत्यूनंतर ‘आत्मा’ शरीरापासून वेगळा होतो आणि ‘जजमेंट डे’ च्या दिवशी हे दोन्ही पुन्हा एकत्रित येतात.
● या शब्दाचा वापर 18व्या शतकापासून सुरू झाला.
● 5व्या शतकात मृत्यूनंतर कबरींवर ‘Requiescat In Pace’ शब्द लिहिलेले आढळतात.
● ख्रिश्चन धर्मापासूनच हा शब्द वापरण्याची पद्धत सुरू झाल्याचे बोलले जाते.