Take a fresh look at your lifestyle.

आमदार निलेश लंकेंचा जनता दरबार सोमवारी भरणार !

गावागावातील प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

पारनेर : आज (१ एप्रिल) पासून राज्यामध्ये पूर्णपणे कोरोना निर्बंध उठवण्यात येत असून ४ एप्रिलला आमदार निलेश लंकेंच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी पारनेर तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत असून ४ एप्रिल रोजी बाजार तळावरील आंबेडकर भवनामध्ये जनता दरबाराचे आयोजन केले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटघन मेजर व दादा शिंदे यांनी दिली.
गावागावांतील प्रलंबित प्रश्न व सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांनी आपल्या समस्या या जनता दरबारात मांडाव्यात असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. सर्वसामान्य मतदारांना शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये.छोटीमोठी कामे तात्काळ व्हावी या उद्देशाने या जनता दरबाराचे आयोजन केले जात आहे. तसेच आपल्या समस्या जाहीरपणे मांडता याव्यात व त्या समस्यांचा तत्काळ निपटारा व्हावा यासाठी महसूल विभाग पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर पोलीस स्टेशन आरोग्य विभाग भुमिअभिलेख सहाय्यक निबंधक कार्यालय शिक्षण विभाग दुय्यम निबंधक कार्यालय भूमिअभिलेख कार्यालय या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना बरोबर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके जनता दरबाराचे आयोजन करत असतात.
पारनेर तालुक्यातील जनतेच्या ज्या छोट्या-मोठ्या समस्या आहे त्याच समस्यांचा निपटारा या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन या जनता दरबारात केला जात आहे. तरी या जनता दरबार तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या लेखी स्वरूपात मांडावा असे आव्हान प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटघन,नगराध्यक्ष विजय औटी यांनी केले आहे.