Take a fresh look at your lifestyle.

मुर्ख लोकांविषयी माऊली काय म्हणतात?

आपली गणना कशात होईल?

तेवीं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे।।९/४९९
माऊली म्हणतात,त्याप्रमाणे विषयांमधे जे सुख आहे ते निव्वळ कडेलोटीचे दु:खच आहे. परंतु काय करावे ? लोक मूर्ख आहेत. विषयांचे सेवन केल्यावाचून त्यांचे चालतच नाही.
कां शीस खांडूनि आपुलें । पायींच्या खतीं बांधिलें । तैसें मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें ॥
किंवा आपले मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जसे बांधावे तसे या मृत्युलोकातील सर्व व्यवहार, चाललेले आहेत.
आपल्या ठायी विषय हाच ठासून भरलेला दिसतो.त्यात तुम्ही आम्ही सगळेच आलो.विषय हा विष धातुपासुन तयार झालेला शब्द आहे. जेथे विषाची पेरणी आहे तेथे एक दिवस अपाय ठरलेला आहे. त्याला स्लो पॉयझन म्हटले की आपल्याला लगेच कळेल.हळूहळू मरणाची तयारी करण्याची ही तऱ्हा आहे.
इतर मार्गानेही मरण येणारच आहे,पण विषयात रममाण झाल्यावर मृत्यू सहज रहात नाही.अगदी मरण समोर दिसत असताना सुद्धा मी गेल्यावर मागच्यांचं काय होईल या चिंतेने मृत्यू आधीच मरण आलेले असते.
वास्तविक कुणाच्या जाण्याने हे जग थांबत नाही एवढी समज पुरेशी आहे. पण ते आपल्या अंगाला आपण चिकटवून पहात नाही हेच दुःखाचं कारण आहे.
रामकृष्णहरी