Take a fresh look at your lifestyle.

शेतीसाठी उपकरणे खरेदी करताय?

मग सरकारी अनुदानाचा असा लाभ घ्या!

शेती उत्पादन वाढवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने स्माम किसान योजना सुरु केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना 50 ते 80 टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कमी किमतीत खत, खते इत्यादी आर्थिक आणि शेती संबंधित उपकरणे, वस्तूही पुरवल्या जातात. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
लाभ कोणासाठी? : संपूर्ण देशात शेती करणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. याअंतर्गत महिला शेतकरीदेखील फायदा घेऊ शकतात. याद्वारे केंद्र सरकार शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांवर बाजारातील दरावर 50 ते 80 टक्के अनुदान देते.
आवश्यक कागदपत्रे :
● आधारकार्ड.
● वास्तव्याचे प्रमाणपत्र.
● सातबारा उतारा.
● बँक पासबुक.
● मोबाईल क्रमांक.
● जातीचा दाखला.
● पासपोर्ट आकाराचा फोटो.
लाभ घेण्यासाठी अर्ज कसा कराल? :
● सर्वप्रथम https://agrimachinery.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
● या ठिकाणी Registration हा पर्याय दिसेल. त्यामध्ये ‘फार्मर’ हा पर्याय निवडा.
● यावर क्लिक केल्यास एक पेज सुरू होईल. त्यावर नोंदणी करा.
● त्यानंतर नाव, आधार क्रमांक नमूद करा.
● तुम्हाला अर्जात संपूर्ण माहिती भरावी लागेल.
● शेवटी ‘सबमिट’ वर क्लिक करा.
● तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.