Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸31 मार्च 2022

▪️मेष : हौसेचे मोल लक्षात घ्याल. समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. विषय वासना वाढू शकते.
▪️वृषभ : उपासनेसाठी वेळ काढावा. खिलाडु वृत्तीने वागाल. मित्रांशी पैज लावाल. बुद्धिकौशल्याने कामे करण्याकडे कल राहील.
▪️मिथुन : घरगुती कामे सुरळीत पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. बागबगीच्याच्या कामात गुंग व्हाल. समोरील सर्व गोष्टीत आनंद मानाल.
▪️कर्क : साहित्य प्रेम दर्शवाल. भावंडांच्या सहवासात जुन्या आठवणीत रमाल. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. जास्त चौकसपणा दाखवाल.
▪️सिंह : कचेरीच्या कामात वेळ लागू शकतो. सामाजिक संबंध जपावेत. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल. भागीदारीच्या कामात काही नवीन बदल करावेत.
▪️कन्या : घरगुती प्रसंग शांतपणे हाताळावेत. काही कामे फार कष्ट न घेता पार पडतील. स्वत:चे म्हणणे खरे कराल. इतरांबद्दल मत बनवण्याआधी सारासार विचार करावा.
▪️तूळ : हातातील अधिकाराची जाणीव ठेवावी. आर्थिक उलाढाल सावधगिरीने करावी. उगाचच नसत्या काळज्या करत बसाल. ध्यानधारणा करण्याकडे लक्ष द्यावे.
▪️वृश्चिक : व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने समाधानी राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांना खुश करता येईल.
▪️धनू : कोणतेही धाडस करतांना सावधानता बाळगावी. प्रवासात काळजी घ्यावी. जबाबदारी लक्षात घेऊन वागावे. राग आवरता घ्यावा लागेल.
▪️मकर : थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त कराल. क्षमाशीलतेने वागाल. तात्विक विचार मांडाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळवाल.
▪️कुंभ : इतरांच्या मताचा विचार करावा. योग्य संधीची वाट पहावी. बौद्धिक ताण जाणवेल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात.
▪️मीन : वैचारिक सुसूत्रता ठेवावी. जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल. तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल. कामात उर्जितावस्था येईल.