Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸30 मार्च 2022

▪️मेष : कामात स्त्री वर्गाचा हातभार लागेल. कमिशनमधून लाभ मिळेल. तुमच्याबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतो. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल.
▪️वृषभ : तुमच्यातील कार्यक्षमता दाखवून द्यावी. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा. रागावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
▪️मिथुन : जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करा. जुनी प्रकरणे त्रासदायक ठरू शकतात. मानसिक स्वास्थ्य जपावे.
▪️कर्क : अचानक धन लाभाची शक्यता. मालमत्तेचे व्यवहार सावधतेने करावेत. जनसंपर्क वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.
▪️सिंह : कामात काही स्वरुपाचे बदल करावे लागतील. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.
▪️कन्या : वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका. प्रवासात काळजी घ्यावी. मुलांचे विचार विरोधी वाटू शकतात.
▪️तूळ : काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. कलेचा आस्वाद घ्याल. जवळचे मित्र भेटतील. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी.
▪️वृश्चिक : घरासाठी मोठी वस्तु खरेदी कराल. सामुदायिक वादापासून दूर राहा. प्रवासात क्षुल्लक त्रास जाणवू शकतो. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.
▪️धनू : चुगल्या करणार्‍या व्यक्तींपासून दूर रहा. कष्टाने कार्य पार पाडाल. धाडसाने कामे हाती घ्याल. कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा.
▪️मकर : मानसिक चंचलतेला आवर घालावी. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. जवळच्या ठिकाणी प्रवासाचा योग येईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडाल.
▪️कुंभ : अपयशाला घाबरून जाऊ नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. आपले व्यक्तिमत्वाची इतरांवर छाप पाडाल.
▪️मीन : भावंडांशी मतभेद संभवतात. तरुणाचे विचार जाणून घ्याल. पत्नीची उत्तम साथ मिळेल. क्षणिक सौख्याची अनुभूती घ्याल.