Take a fresh look at your lifestyle.

पारनेरात उद्या होणार ढोलकी डफ अन् तुणतुण्याच्या गजर !

शहरात फुलणार भक्तीरसाचा मळा.

पारनेर : श्री.सत्य अविनाश पारखपद समाज पारनेर आयोजित,सालाबादा प्रमाणे प. पु . सद्गुरू आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांचे ज्येष्ठ नातू व सद्गुरु ब्रह्मनिष्ठ हरिदास महाराज चौरे यांचे चिरंजीव परमपूज्य सद्गुरु किसन बाबा चौरे यांचा अठरावा पुण्यतिथी सोहळा पारनेर येथे जामगाव रोड येथे आत्मज्ञानी गणपत बाबा मठामध्ये उद्या (बुधवारी) संपन्न होत आहे.
कोरोना विषाणूच्या जैविक महामारी मध्ये लॉकडाऊनच्या कारणाने गेली दोन वर्ष या धार्मिक कार्यक्रमावर जमावबंदी असल्याने सर्व धार्मिक सोहळे बंद होते .परंतु यावर्षी किसनबाबा चौरे यांचा महाराष्ट्रभर असणारा शिष्य सांप्रदायांनी या वर्षी पारनेर येथील आत्मज्ञानी गणपत बाबा मठ या ठिकाणी सद्गुरु किसन बाबा चौरे यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय व मंगलमय वातावरणात करण्याचे आयोजन केलेले आहे.
 प. पु .सद्गुरु किसनबाबा चौरे यांचे अध्यात्मिक अधिष्ठान हे वेगळ्या स्वरूपाचे होते . संसारिक जीवन जगत असताना गुरुज्ञानाचा अवलंब करून परमार्थिक सुख कशाप्रकारे अनुभवावे यासाठी सद्गुरुचा साधकाच्या जीवनात कशाप्रकारे लाभ होतो हे किसन बाबांनी आपल्या जीवनात दाखवून दिले . आत्मज्ञानी गणपत बाबांच्या अध्यात्मिक कार्यात आपले आयुष्य घालवून योग साधनेतून आनंदी जीवन कसे जगावे त्या साठी जीवनात सद्गुरु पदाचे महत्त्व काय असते याची जाणीव आपल्या शिष्य मंडळांना पटवून दिले.
संपूर्ण महाराष्ट्रभर किसनबाबांचे शिष्य मंडळ पसरलेले आहेत. समाजातील जातिभेद अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती मोडण्यासाठी त्यांनी आपल्या गुरुपदाचा वापर करून शिष्य गणांना परमार्थिक सुखाची प्राप्ती करून दिली.
अहमदनगर जिल्ह्यासह कोल्हापूर , सातारा , सांगली , पुणे या सह महाराष्ट्रात विविध ठिकाणी ढोलकी डफ तुनतुन्याच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व समाज प्रबोधनपर कार्य करणारे हे सत्य अविनाश पारखपद समाज असून इतर जिल्ह्यातून हजारो भाविक भक्त हे पारनेर मध्ये या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने एकत्र जमतात व पारनेरच्या बाजारपेठेतून सद्गुरु प्रतिमेची भव्य मिरवणूकीच्या माध्यमातून अध्यात्मिक भेदिक भजने व कलगी तुऱ्याचा सामना या लोककलेच्या माध्यमातून पारनेर शहरात पारनेरकरांना अनुभवयास मिळतो.व संपूर्ण पारनेर शहर हे भक्तीमय होऊन जाते.हा सोहळा बुधवारी (३०मार्च)रोजी संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाची रूपरेषा,
दुपारी १२ ते ३ वा. पारखपद सत्संग भेदीक गायन भजन दुपारी ३ ते ६ वा. पारनेर शहरातुन सद्गुरू प्रतिमेची भेदीक, गायन, लेझिम डावासह मिरवणूक सायं.०६ ते ७ वा.पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या हस्ते सद्गुरू पादुका पुजन व सायं. ७ ते ८ वा. महाप्रसाद
रात्री ८ ते सकाळ पर्यंत अध्यात्मिक भेदीक कलगीतुरा कार्यक्रम रात्री ८ ते सकाळ पर्यंत महाराष्ट्रातील नामवंत भेदीक शाहीरांचा सवाल जवाबाचा कलगी तुऱ्याचा कार्यक्रम होईल. कोल्हापुर, सांगली, अहमदनगर, पुणे, सोलापुर इ. ठिकाणाहुन नामांकीत शाहीर आपली सेवा सादर करणार आहेत.आत्मज्ञानी गणपत बाबा मठ, जामगाव रोड, पारनेर येथे सदर कार्यक्रमास उपस्थित राहून परमार्थिक सुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू सद्गुरु बबनदादा चौरे ,ज्येष्ठ शाहीर निजामभाई शेख व समस्त सत्य अविनाश पारख पद समाज पारनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे .