Take a fresh look at your lifestyle.

ऑस्कर पुरस्काराची ट्रॉफी खरंच सोन्याची असते का?

'अशी' आहे रंजक माहिती !

कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. या पुरस्कारात मिळणारी ट्रॉफी सोनेरी रंगाची असते. तिला सोनेरी बाहुली म्हणून देखील ओळखले जाते. मात्र ही ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? ट्रॉफीची किंमत नेमकी किती असते? त्याचा फायदा काय होतो? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
फायदा काय? : माहितीनुसार ऑस्कर मिळालेल्या विजेत्या कलाकारांचे मानधन 3 ते 4 पटीने वाढते. मानधनात जवळपास 81 टक्क्यांनी वाढ होते. मात्र अभिनेत्याच्या मानधनातच तुलनेत अभिनेत्रींच्या मानधनात कमी वाढ होते.
सोनेरी बाहुली सोन्याची असते का? : ऑस्करची ट्रॉफी तांब्याची असते. त्यावर 24 कॅरेट सोन्याचा मुलामा लावला जातो. मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान, धातूच्या कमतरतेमुळे तीन वर्ष ऑस्कर ट्रॉफी रंग लावलेल्या प्लॅस्टरमध्ये तयार करण्यात आले.
किंमत किती? : या ट्रॉफीची किंमत त्यावेळीच्या तांबे आणि सोन्याच्या किंमतीवर अवलंबून असते. तर दरवर्षी या एका ट्रॉफीची निर्मिती करण्यासाठी 400 डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 31 हजार रुपये खर्च येतो.
ट्रॉफी विकता येते का? : नियमानुसार, कोणत्याही विजेत्याचा ऑस्कर ट्रॉफीवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क नसतो. त्यामुळे विजेत्याची इच्छा असली तरी तो ऑस्कर ट्रॉफी विकू शकत नाही. जर विजेत्याला ती ट्रॉफी विकायची असेल तर त्याला सर्वात आधी ती अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सला विकावी लागते. ही अकादमी 1 डॉलरला ऑस्कर ट्रॉफी विकत घेते.
ऑस्कर एंट्रीवर किती रक्कम खर्च केली जाते? : माहितीनुसार, ऑस्करमध्ये एखाद्या चित्रपटात एंट्रीसाठी 30 लाखांपासून ते कोट्यवधींपर्यंतचा खर्च येऊ शकतो. चित्रपटाच्या एंट्रीनंतरही अनेक ठिकाणी पैसा खर्च करावा लागतो. जसे की, चित्रपटाचे प्रमोशन करणे, चित्रपट पाहण्यासाठी लोकांना पटवून देणे, यांसह विविध बाबी.