Take a fresh look at your lifestyle.

आमदार निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांनी दिले ‘ पावनखिंड’चे धडे !

तीनशे कार्यकर्त्यांसह आमदारांनी पाहिला 'तो' थरार.

✒️ सतीश डोंगरे
शिरूर: पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी रविवारी शिरूर मधील ऑक्सीगोल्ड थिएटरमध्ये आपल्या तीनशे कार्यकर्त्यांसह ‘पावनखिंड’ चित्रपटाचा आनंद लुटला. यावेळी आमदार निलेश लंके यांच्यासमवेत नगराध्यक्ष विजय औटी, अर्जुन भालेकर, अशोक चेडे, योगेश मते, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ.सचिन औटी, विजय भास्कर औटी, बाळासाहेब नगरे, सुभाष शिंदे, भुषण शेलार आदींसह ३०० कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरूरच्या ऑक्सीगोल्ड चित्रपटगृहात गेल्या दोन महिन्यापासून पावनखिंड हा चित्रपट हाऊसफुल्ल चालू आहे. आज दुपारी तीन ते सहा खेळाचे बुकिंग आमदार लंके यांनी खास आपल्या कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवले होते. यावेळी शिरूरमधील ‘निलेश लंके प्रतिष्ठान’ चे कार्यकर्तेही या हा चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
“हा चित्रपट अतिशय सुंदर आहे. कार्यकर्त्यांना बाजीप्रभूच्या शौर्याची माहिती व्हावी व त्यांनी त्यापासून स्फूर्ती घ्यावी या हेतूने हा ऐतिहासिक पावनखिंड चित्रपट मी कार्यकर्त्यांसह पाहून या चित्रपटाचा आनंद लुटला,”असे आमदार लंके यांनी यावेळी ‘पारनेर दर्शन’ शी बोलताना सांगितले.
 ” हा चित्रपट दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला गेली अनेक दिवस आमची हा चित्रपट पाहण्याची इच्छा होती परंतु आमदार लंके यांच्यासोबतच हा चित्रपट पहायचा अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, त्यामुळे आम्ही आमदारांसह या चित्रपटांचा आनंद लुटला, असे पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी सांगितले.
“आमदार लंके यांनी प्रथमच हे थिएटर पाहिले आणि समाधान व्यक्त केले. शिरूरसारख्या ग्रामीण भागात एवढे सुंदर चित्रपटगृह असेल याची कल्पनाही माझ्या मनात नव्हती. तुम्ही लोकांना करमणुकीसाठी या चित्रपटगृहाच्या माध्यमातून चांगला पर्याय दिला,” असे आमदार लंके यांनी आवर्जून सांगितले. अशी माहिती या चित्रपटगृहाचे व्यवस्थापक संदीप गायकवाड यांनी दिली.