Take a fresh look at your lifestyle.

मनाला जे भावतं तेच आनंद देतं !

भावल्याशिवाय जे जे बोलतो ते सगळं स्वार्थी असतं.

मानवी शरीर हे अदभूत यंत्र आहे. दृष्य अवयवांपेक्षा अदृष्य अवयवच हे शरीर सुरळीत चालवत असतात.मनाला आवडणाऱ्या क्रिया शरीर करत असते.मनाला आवडणारी गोष्ट मिळाली नाही की त्याचा थेट परिणाम शरिरावर होत असतो.आपण भावना व्यक्त करताना सतभावना व्यक्त केल्या तर शरीर स्वस्थ रहाते.पण हल्ली आपण तसं वागत नाही हे अगदी खरं आहे. आपल्या भावना व्यक्त करताना आपण चलाखी करतो.पण शरीराला हे मान्य नसतेच.

एखाद्या व्यक्ती विषयी आपल्या मनात खूप राग असतो पण प्रत्यक्ष ती व्यक्ती आपल्या समोर आली की परिस्थितीनुरुप आपण चांगले बोलतो.त्यातही त्यात काही स्वार्थ असेल तर आपलं सगळच बोलणं खोटं,नाटकी असतं.आतल्या भावना आपण ओठावर येऊ देत नाही. ही विरुद्ध प्रतिक्रिया शरीरात अनेक घातक रासायनिक अभिक्रिया घडवते.त्यानुसार आपल्या शरीरात बदल घडत असतात.सुक्ष्म रुपाने विकाराचा विकास सुरू होतो.चेहऱ्यावर त्याचे परिणाम सर्वाधिक होतात.

लहानपणी गोंडस असणारा चेहरा वयपरत्वे अक्राळविक्राळ होत जातो.अनेक स्नायुंच्या तानाने चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्याचे काम नैसर्गिक रित्या होत असते त्यात बिघाड होतो.वेड्या मनुष्याला जसे काय करावे याचे भान रहात नाही,तसे योग्य आणि सत्य तऱ्हेने व्यक्त न झाल्याने शारीरिक सौंदर्य लोप पावते.पण हे एकाएकी घडत नसल्याने मनुष्याला त्याचे भान रहात नाही. आतुन बाहेरून एकच भावना व्यक्त करणारी व्यक्ती मरेपर्यंत राजस आणि सुकुमार रहाते.पण त्यात सद्भावनांचा भरणा मोठा असावा लागतो.स्रियांच्या सौदर्यात वयपरत्वे कुरुपता येण्याचे प्रमाण नगन्य आहे. कारण त्या तात्काळ व्यक्त होतात.डोळ्यात पटकन अश्रु येतात.त्यामुळे अतिरिक्त ताण वजा होत असतो.

भावनाप्रधान मनुष्य शरीराची सुंदरता टिकवण्यात यशस्वी होतो.थोडक्यात सांगायचं म्हटलं तर खरं वागणारी माणसं लोभस वाटतात.शरिरावरची त्यातही चेहऱ्यावरची रेषानरेषा हे आमच्यात शुध्दतेची मात्रा किती आहे?याचा परिचय देत असतात.सात्विक माणसांबरोबरच भामटी,कारस्थानी माणसं नुसत्या चेहऱ्यावरुन ओळखता येतात,याचा अनुभव आपण अनेकदा घेतो.प्रभावशाली माणसं खोट्याला थारा देत नसावीत,त्यामुळेच ती प्रत्येकाला आपलसं करु शकतात.मनाला जे भावतं तेच आनंददायी असतं.आपणही त्या रांगेत असलं पाहिजे.
रामकृष्णहरी