Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 22 सप्टेंबर 2021 

 

▪️मेष : संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. प्रवास संभवतात. वरिष्ठ अधिकार्‍याची गाठ पडेल.  .

▪️वृषभ : भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. आपलेच मत समोरच्या व्यक्तिला पट‍वून द्या. अंगीभूत कुशलता योग्य जागी वापरा.

▪️मिथुन : व्यवसायात एखादा प्रयोग कराल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. उत्तम भाषाशैली वापराल.

▪️कर्क : कौटुंबिक सुखात वाढ होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक सुखात वृद्धी होईल.

▪️सिंह : जुने छंद जोपासावेत. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांशी योग्य ताळमेळ राहील.

▪️कन्या : उगाचच कच खाऊ नका. व्यसनांपासून दूर रहा. विरोधक नरमाईने घेतील. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

▪️तूळ : झोपेची तक्रार जाणवेल. आपले वागणे लोकांना चमत्कारिक वाटेल असे वागू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.

▪️वृश्चिक : प्रत्येक कामात उगाचच ढवळाढवळ करू नका. ज्येष्ठ व्यक्तींची गाठ पडेल. एका भेटीमुळे अनेक कामे मार्गी लागतील.

▪️धनु : अविवेकाने वागू नका. क्रोध वृत्तीत वाढ होईल. जवळचा प्रवास सुखकारक होईल.

▪️मकर : गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध ठेवा. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. इतरांना आनंदाने मदत कराल.

▪️कुंभ : दिवस मनाप्रमाणे घालवाल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. प्रलंबित कामे मार्गी लागतील.

▪️मीन : धार्मिक कामात रस घ्याल. मौसमी आजारापासून काळजी घ्या. कौतुकासाठी काही काळ वाट पहावी लागेल.