तुकोबाराय म्हणतात,काय काशी करिती गंगा।भितरिं चांगा नाही तो।। काशी तिर्थक्षेत्री मरण आले तर मोक्ष प्राप्त होतो,गंगास्नानाने पाप नाहिसं होतं असं धर्मशास्त्र सांगतं.पण आपण याकडे कसं पहातो ते अधिक महत्त्वाचे आहे. वरवर पहाता ही अंधश्रद्धा आहे म्हणून शिक्कामोर्तब केला जाईल. पण सार्थ जीवन जगण्याची ती एक कडी आहे,जर अध्यात्मिक विचारधारा नीट समजून घेतली तर…
त्यासाठी आपण एक दृष्टांत पाहु मग सिद्धांताकडे जाता येईल.
एकदा भगवान शंकर आणि पार्वतीमाता गंगाकिनारी आले असता,पार्वतीमातेने एक प्रश्न विचारला,”इथं गंगास्नानासाठी एवढी गर्दी आहे,गंगास्नानाने पाप नष्ट होतं मग स्नान करुन येणारी माणसं प्रसन्न का वाटत नाहीत?”हसतच भगवान शंकरांनी उत्तर दिलं,”इथं आलेल्या कुणालाही गंगास्नान घडलेलं नाही.”पार्वतीमाता आश्चर्य व्यक्त करत म्हणाली,”अहो अजून त्यांची वस्त्र सुद्धा ओली आहेत आणि तुम्ही म्हणता गंगास्नान झालेलं नाही?” भगवान शंकर म्हणाले,”तुला एक गंमत दाखवतो मी सांगेल तसं तु कर.”भगवान शंकरांनी एक वृद्धाचं रुप घेतलं आणि पार्वतीला मात्र रुपवतीच रहायला सांगितले.पावसाची रिपरिप चालु होती.गंगेकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल गाळ झालेल्या एका खड्ड्यात भगवान शंकरांनी उडी मारली.म्हणाले पार्वती मला जर कुणी वाचवायला आले तर त्यांना म्हणावं ज्यांचं पाप नष्ट झालं आहे त्यांनीच हात लावा अन्यथा तुमचं जळुन भस्म होईल.
पार्वती माता वाचवा वाचवा म्हणून ओरडु लागली.त्या रुपवतीला पाहुन अनेकजन जवळ यायचे गाळानं माखलेला वृद्ध पाहिल्यावर काढण्यासाठी तयार व्हायचे पण अट ऐकली की निघून जायचे.शेकडो लोकं आली आणि गेली. पण कुणीही स्वतःला गंगास्नानाने पापमुक्त झालो अस म्हणु शकला नाही. काही वेळाने एक मनुष्य गंगास्नान करुन आला.त्याने खड्ड्यात वृद्ध पडलेला पाहिला व लगेच त्यात उडी मारली.पार्वतीमातेने अट सांगितल्यावर तो म्हणाला,मी गंगास्नानाने पवित्र झालो आहे. पापमुक्त झालो की नाही मला माहिती नाही, मी भस्म होणार असलो तरी चालेल मी माझा परोपकाराचा धर्म सोडणार नाही. असं म्हणून त्याने वृद्धाला खड्ड्यातुन बाहेर काढले.
भगवान शंकर पार्वतीमातेला म्हणाले,”पार्वती या एकालाच गंगास्नान घडले आहे,आणि हा पापमुक्तही झाला आहे.”
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। आज ही http://www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये। अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421