Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸25 मार्च 2022

0
▪️ मेष : गप्पा-गोष्टींमध्ये वेळ घालवाल. दिवस व्यग्रतेत जाईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. लहानांमध्ये मन रमेल.
▪️वृषभ : फायद्याकडे लक्ष द्यावे. चातुर्याने व्यवहार कराल. आवडते पुस्तक वाचाल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधाल.
▪️मिथुन : शिस्तीचा फार बडगा करू नये. कलेतून चांगली कमाई होईल. प्रगल्भ लिखाण कराल. धोरणीपणे वागणे ठेवाल.

▪️कर्क : आपलेपणाची जाणीव ठेवून वागाल. अति विचार करू नयेत. भावंडांची काळजी लागून राहील. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल.
▪️सिंह : बौद्धिक कामात गती येईल. विरोधकांचा जोर मावळेल. हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल.
▪️कन्या : पैशाचा योग्य विनिमय करावा. नसत्या गोष्टीत अडकू नका. दिवस आळसात जाईल. स्वत:चा मानसिक गोंधळ उडवून घेऊ नका.

▪️तूळ : भावंडांशी मतभेद संभवतात. हातात नवीन अधिकार येतील. पराक्रमाला अधिक बळ मिळेल. तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावतील.
▪️वृश्चिक : हित शत्रूंवर मात करता येईल. हातातील कामात यश येईल. आर्थिक गणिते सुटतील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
▪️धनू : आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करता येईल. चिंतन करण्यात वेळ घालवाल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नवीन गोष्टी जाणून घ्याल.

▪️मकर : धार्मिक यात्रेचे आयोजन करावे. आवक-जावक यांचा मेळ घालावा. अनाठायी खर्च टाळावा. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका.
▪️कुंभ : हजरजबाबीपणा दाखवाल. सर्व गोष्टी उत्तमरीत्या जाणून घ्याल. जास्त चिकित्सा करू नका. हटवादीपणा करू नये.
▪️मीन : गायन कलेचे कौतुक केले जाईल. घराबाहेर वावरतांना सावधानता बाळगावी. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वतंत्र वृत्ती दर्शवाल.
Leave A Reply

Your email address will not be published.