Take a fresh look at your lifestyle.

विधानसभेत घुमला पारनेर-नगर मतदारसंघाचा आवाज!

पाणी,आरोग्य आणि उद्योगाबाबत थेट सरकारलाच साकडे.

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारनेर- नगरचे आमदार निलेश लंके यांनी विधानसभेचे लक्ष वेधले. अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांसंदर्भात पाठिंबा आणि चर्चा करण्यासाठीआ. लंके बोलत होते. मतदार संघातील पाणी, आरोग्य आणि उद्योग याबाबत महत्त्वपूर्ण मागण्या त्यांनी केल्या. यासंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री याबाबत सकारात्मक भूमिका घेतील असा आशावाद त्यांनी सभागृहात व्यक्त केले.
गेल्या अडीच वर्षांमध्ये आमदार निलेश लंके यांनी आपल्या कामाची चमक दाखवली आहे. कोरोना वैश्विक संकटामध्ये सर्वाधिक काम केल्याने त्यांच्या कार्याची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे. आपला जीव धोक्यात घालून पन्नास हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांना मोफत उपचार त्यांनी आपल्या कोविड सेंटरमध्ये दिले. हे करीत असताना मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला. या मतदारसंघातील अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. आजही मोठ्याप्रमाणात भूमिपूजन सुरू आहेत. आमदार निलेश लंके यांनी पारनेर -नगर चा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे. हे करत असताना समाजोपयोगी उपक्रम सुरूच आहेत. त्यांच्या कामाचे दस्तुरखुद्द शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा कौतुक केले.
दरम्यान,आमदार म्हणून त्यांनी आपली कार्यतत्परता आणि कार्यक्षमता सिद्ध केली आहेच. त्याचबरोबर विधानसभेतही आपल्या मतदार संघातील विविध प्रश्नांवर पोटतिडकीने आवाज उठवण्याचे काम आ. लंके करीत आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला पारनेर नगरच्या आमदाराने मंगळवारी पाठिंबा दिला. यातून मिळणारे अनुदान आणि त्या वरील मागण्या यावर विधानसभेत चर्चा सुरु आहे. त्यामध्ये आमदार निलेश लंके यांनी मंगळवारी सहभाग घेतला. त्यांनी अर्थसंकल्पाला पाठिंबा देत आपल्या मतदारसंघातील मागण्या सभागृहासमोर मांडल्या. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उद्योगमंत्री याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन आमच्या सर्व मागण्या मान्य करतील. त्यामुळे या मतदारसंघातील पाणी त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास आ.लंके यांनी व्यक्त केला.

सभागृहात या मागण्या मांडल्या!

▪️पारनेर -नगर विधानसभा मतदारसंघात गेल्या पन्नास वर्षांपासून सकाळी पाणीपुरवठा योजनेकरिता शेतकरी पाठपुरावा करीत आहेत. जलसंपदा मंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यास पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.
▪️त्याचबरोबर राळेगण-सिद्धी परिसरातील चौदा गाव पाणीपुरवठा योजना, जातेगाव, पुणेवाडी, आणि कान्हुर पठार उपसा योजनेला मान्यता देण्यात यावी.
▪️ढवळपुरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पारनेर उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देण्यात यावी.
▪️अहमदनगर पुणे महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा विचार करून सुपा येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारावे.
▪️ढवळपुरी या दुर्गम भागांमध्ये औद्योगीकरण करून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा