Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸23 मार्च 2022

▪️मेष : मैत्रीचे नवीन संबंध जोडले जातील.तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल.
▪️वृषभ : उगाच चिडचिड करू नका.तुमच्या मनातील आशा पल्लवित होतील. मित्रांची मदत घ्यावी लागेल. काही कामात अनाठायी अडकून पडाल.
▪️मिथुन : तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. स्त्रियांच्या सानिध्यात वावराल. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात घाई करून चालणार नाही.

▪️कर्क : फार हट्टीपणा करू नका. उगाच नसत्या काळज्या करत बसू नका. वाताचे त्रास संभवतात. अनाठायी चिडचिड वाढू शकते.
▪️सिंह : अंगीभूत कलेला चांगला वाव मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनाची विशालता दाखवाल.
▪️कन्या : एकाचवेळी अनेक कामे अंगावर घ्याल. बौद्धिक थकवा जाणवेल. उगाचच नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत.

▪️तूळ : नसते साहस करतांना सारासार विचार करावा. मुलांशी लहान-सहान गोष्टीवरून कुरबुर होऊ शकते. खर्चाचे भान ठेवावे लागेल.
▪️वृश्चिक : आपली आर्थिक कुवत लक्षात घ्यावी. वादावादीत सहभाग नोंदवू नका. मागचा-पुढचा नीट विचार करावा. उतावीळपणे वागू नका.
▪️धनू : चटकन रागवू नका. आपले उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. आपलेच म्हणणे खरे कराल. विचारांना वेगळी दिशा देऊन पहावी.

▪️मकर : संसर्गजन्य विकार जडू शकतात. कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. वादाचा मुद्दा टाळावा.
▪️कुंभ : सांपत्तिक दर्जा टिकवून ठेवावा लागेल. मनात प्रबळ इच्छा जागृत होईल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा.
▪️मीन : महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. तडफदारपणे वागणे ठेवाल. कामे जलद गतीने उरकाल.