Take a fresh look at your lifestyle.

पावसाच्या थेंबांपासून होणार वीजनिर्मिती…!

कोणी केले 'हे' संशोधन? जाणून घ्या!  

 

संशोधकांना पावसाच्या थेंबांपासून वीजनिर्मिती करण्यात यश मिळालंय. विविध संस्थांच्या मदतीने, 3 वर्ष अभ्यास केल्यानंतर IIT दिल्लीने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

हे उपकरण पावसाच्या थेंबांमध्ये असलेली कायनॅटिक एनर्जी आणि इलेक्ट्रिक चार्ज यांच्या मदतीने वीज निर्माण करते. सध्या या उपकरणाचे डेमो मॉडेल तयार झाले आहे लवकरच पेटंट प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. लवकरच या मशीनच्या माध्यमातून छोटी उपकरणे चार्ज होतील.

लिक्विड-सॉलिड इंटरफेसने हे उपकरण बनवण्यात आलंय. पावसाचे थेंब यावर जोरात आदळण्यानंतर होणाऱ्या ‘ट्रिबोइलेक्ट्रिक इफेक्ट’च्या माध्यमातून वीज निर्माण होणार आहे. यामुळे उपकरणात असलेले नॅनो सेल्स चार्ज होतील.

हे संशोधन आयआयटी दिल्लीसोबतच मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन, टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. आगामी काळात पावसाच्या पाण्याप्रमाणेच, समुद्राच्या लाटांचा वापर करुन वीज तयार करण्याचा त्यांचा विचार सुरु आहेत.

या संशोधनाचा भविष्यात मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. तसेच या उपकरणाला पेटंट मिळाल्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य होणार आहे. कदाचित काही काळातच हे उपकरण सर्वांसाठी उपलब्ध केले जाईल.

पावसाळ्यामध्ये सोलार उपकरणे अनेकदा काम करत नाहीत. अशात पावसाच्या पाण्यापासून ऊर्जा निर्माण करणारे हे उपकरण फायद्याचे ठरणार आहे.