Take a fresh look at your lifestyle.

घराती फरशी स्वच्छ करण्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी! 

तर मग उपयुक्त टिप्सवर नजर टाकूयात !

अनेकदा घरातील पिवळ्या फरशीमुळे लोकं खूप त्रस्त असतात. यावर मात करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा? हे कळत नाही. अशा परिस्थितीत खालील काही टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. त्यावर एक नजर टाकूयात…
● एक बादली पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्या पाण्याने संपूर्ण फरशी स्वच्छ करा. यामुळे फरशी चमकदार होते आणि सोबत पिवळसरपणाही दूर करता येतो.
● पाण्यात बेकिंग सोडा पावडर मिसळा आणि त्यात सुती कापड भिजवून फरशी पुसल्याने फरशी लवकर साफ करता येते. यामुळे खुणा देखील लगेच काढता येतात.
● एक कप पाण्यात रॉकेल मिसळा आणि सूती कापड भिजवून फरशी वर पडलेले ठसे साफ करा. यानंतर, कोमट पाण्याने पुन्हा फरशी पुसून घ्या. यामुळे फरशी साफ होते व चमकदार दिसते.
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा :
● फरशी अ‍ॅसिडने साफ करू नका. अन्यथा फरशी खराब होईल.
● फरशी साफ करता असाल तेव्हा रबरचे हातमोजे घाला.
● फरशी पुसताना जाड कापडाने पुसा. हलके कापड लवकर फाटू शकते.