Take a fresh look at your lifestyle.

आयपीएलमधील सर्वात झटपट झालेले 5 विजय!

सर्वात कमी षटकात संघांनी जिंकलेले पहिले पाच सामने पाहूयात... 

 

मुंबई : 2008 च्या पहिल्याच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने त्यांच्यावर केवळ साडेपाच षटकांतच विजय मिळवला होता. लक्ष्य होते 68 धावांचे आणि सनथ जयसूर्याच्या 17 चेंडूतील 48 धावांआधारे मुंबईने साडेपाच षटकातच सामना (87 चेंडू शिल्लक ठेवत) जिंकला होता.

कोची : 2011 च्या आयपीएलमध्ये इंदूरच्या स्टेडियमवर कोची टस्कर्सने राजस्थान रॉयल्सवर 7.2 षटकांतच विजय मिळवला होता. त्यावेळी विजयी लक्ष्य 98 धावांचे होते. ब्रँड हॉज नाबाद 33 धावा करून कोचीच्या झटपट विजयाचा शिल्पकार ठरला होता.

किंग्ज इलेव्हन : 30 एप्रिल, 2017 रोजी मोहाली इथे किंग्ज इलेव्हनने केवळ साडेसात षटकांत एकही गाडी न गमवता सामना जिंकला होता. मार्टिन गुप्तीलने 27 चेंडूतच 50 धावा करताना हाशीम आमलाच्या मदतीने 7.5 षटकातच सामना संपवला होता.

आरसीबी : 2018 मध्ये इंदूरच्याच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने असाच एकही गडी न गमावता 71 चेंडू म्हणजे 11.5 षटके राखून किंग्ज इलेव्हनवर विजय साजरा केला होता. विजयाचे 89 धावांचे लक्ष्य आरसीबीने 8.1 षटकांतच गाठले. विराट कोहली 28 चेंडूत 48 आणि पार्थिव पटेल 22 चेंडूत 40 धावांवर नाबाद परतला.

केकेआर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नुकत्याच झालेल्या सामन्यात 60 चेंडू शिल्लक असतानाच केकेआरकडून पराभव स्विकारावा लागला. रॉयल चॅलेंजर्सला 92 धावांवर गुंडाळल्यानंतर शुभमन गिलच्या 48 व वेंकटेश अय्यरच्या 41 धावांआधारे केकेआरने 10 षटकांतच सामना जिंकला.