Take a fresh look at your lifestyle.

जंक्शन, टर्मिनस आणि सेंट्रलमधील फरक माहिती आहे का?

नसेल तर एकदा वाचाच !

जर तुम्ही रेल्वेने प्रवास केला असेल तर प्रवासादरम्यान जंक्शन, टर्मिनस आणि सेंट्रल, स्टेशनबद्दल ऐकले असेलच. मात्र बहुतेकांना याचा अर्थ माहित नसतो. चला. तर आज आपण जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल याचा नक्की काय अर्थ आहे? तो पाहूयात..
● टर्मिनस किंवा टर्मिनल : हे एक असं स्टेशन जेथून रेल्वे पुढे जात नाही. म्हणजे ज्या दिशेने रेल्वे त्या स्टेशनला पोहोचते, तेथून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याच दिशेने पुन्हा उलटा प्रवास रेल्वेला सुरू करावा लागतो.
● सेंट्रल : अनेक स्टेशनचा समावेश असतो, त्याला सेंट्रल म्हटले जाते. हे शहरातील सर्वात व्यस्त स्टेशन असते. अनेकजागी जुन्या स्टेशनालाही सेंट्रल असे म्हटले जाते.
● जंक्शन : हे त्या रेल्वे स्टेशनला म्हटले जाते, जेथून रेल्वेच्या येण्या-जाण्यासाठी कमीत-कमी तीन पेक्षा जास्त वेगवेगळे मार्ग असतात. म्हणजे रेल्वे कमीत-कमी एकत्र दोन रूटवरून येऊ शकते आणि जाऊही शकते.
● स्टेशन : हे त्या जागेला म्हटले जाते जेथे रेल्वे प्रवाशांसाठी आणि सामानासाठी थांबते. भारतात एकूण आठ ते साडे आठ हजार स्टेशन आहेत.