Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸19 मार्च 2022

▪️मेष : बौद्धिक कौशल्य पणाला लागेल. योग्य नियोजनावर भर द्यावा. नवीन गोष्टींची चाहुल लागेल. प्रवासावर खर्च होईल.
▪️वृषभ : मानसिक स्थिरता बाळगावी. मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कृतीत प्रामाणिकपणा ठेवावा.
▪️मिथुन : सुप्त चळवळेपणा कामाला लावा. विरोधकांच्या कारवाया ओळखा. सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करता येईल. तुटपुंज्या ज्ञानावर खुश होऊ नका.
▪️कर्क : धार्मिक सहलीचे नियोजन कराल. अति लोभ टाळावा. कष्टसाध्य प्रयत्नाला यश येईल. मोठ्या गुंतवणुकीत तज्ञांचा सल्ला घ्यावा.
▪️सिंह : विरोधक माघार घेतील. जमिनीचे व्यवहार पूर्णत्त्वाला जातील. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. आळस झटकून कामाला लागावे.
▪️कन्या : परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. स्थावरच्या कामात लक्ष घाला. व्यावसायिक संघर्ष लक्षात घ्यावा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
▪️तूळ : सोपविलेले काम धडाडीने पूर्ण कराल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. यश डोक्यात जाऊ देऊ नका. कसलीही घाई उपयोगाची ठरणार नाही.
▪️वृश्चिक : कौटुंबिक कुरबुरी लक्षात घ्याव्यात. सरकारी मदत मिळू शकेल. प्रलोभनापासून दूर राहावे. घरात नातेवाईक गोळा होतील.
▪️धनू : प्रवास करावा लागेल. बाह्यरुपावर भुलू नका. मैत्रीपूर्ण प्रेम वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. कामानिमित्त
▪️मकर : उधारीचे व्यवहार टाळावेत. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. एकांत टाळण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक कटकटी दूर कराव्यात.
▪️कुंभ : मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. कलागुणांना वाव द्यावा. दानधर्मावर खर्च कराल. कागदपत्रे जपून ठेवावीत.
▪️मीन : नव्या ओळखीचा फायदा होईल. अपयशाने खचून न जाता प्रयत्न सुरू राहू द्या. वाहन जपून चालवावे. जुने मित्र भेटतील.