Take a fresh look at your lifestyle.

किरीट सोमय्या म्हणाले, थांबा.. परवा मी पारनेरला येवूनच बोलतो !

'पारनेर' कारखान्याची येत्या काही आठवडयात चौकशी सुरू होणार.

 

 

पुणे : “मी पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या सोबत पारनेर साखर कारखान्यास भेट देणार आहे. ३२ कोटी रुपयांमध्ये कशा पद्धतीने कारखाना पवार परिवाराच्या प्रभावाखाली दिला गेला. पवार परिवाराचे घनिष्ठ उद्योगपती मित्र यांनी त्यामध्ये २३ कोटी रुपये कसे टाकले? या सगळ्यांचे पुरावे माझ्या हातात आलेले आहेत.

ईडीसोबत माझी चर्चा सुरू आहे. परवा मी पारनेर साखर कारखान्याची पाहणी केल्यानंतर ईडी सोबत चर्चा करणार आहे. पारनेर साखर कारखान्याची आयकर विभाग, सहकार मंत्रालय आणि ईडी कडून चौकशी सुरू आहे. जरंडेश्वर नंतर पवार परिवाराशी संबंधित पारनेर साखर कारखान्याचा घोटाळ्याबाबत येत्या काही आठवड्यात कारवाई सुरू होणार.” अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी सोमय्या म्हणाले, “हसन मुश्रीफ यांच्या संबंधात मी एवढच सांगणार, की ठाकरे सरकारच्या राज्यात मंत्री झाल्यानंतर त्यांनी कशापद्धतीने गडहिंग्लज साखर कारखाना काबीज केला. कोणत्याही प्रकारची लिलाव प्रक्रिया नाही. थेट मंत्रालयातून हसन मुश्रिफांच्या बेनामी कंपनीला कारखाना दिला गेला आणि त्यात पैशांची हेराफेरी हे उद्धव ठाकरेंच्या राज्यात झालेलं आहे. मी पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या मंत्रालयाचं कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या बेनामी कंपनीला कशा पद्धतीने दिलं, याचे देखील कागदपत्र जनतेसमोर मांडणार आहे.”