Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸18 मार्च 2022

▪️मेष : आवडीचे कपडे खरेदी कराल. सर्वांशी गोडीने वागाल. आकर्षणाला बळी पडाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल.
▪️वृषभ : पत्नीचे लाडिक हट्ट पुरवावे लागतील. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. मानसिक चांचल्या जाणवेल.
▪️मिथुन : लहान-सहान गोष्टींनी निराश होऊ नका. स्वभाव विरोध दर्शवू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

▪️कर्क : उष्णतेचे त्रास संभवतात. पित्त विकार बळावू शकतात. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. कामे वेळेत पूर्ण करता येतील.
▪️सिंह : जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मैदानी खेळ खेळता येतील. चपळाईने कामे हाती घ्याल. आपल्यातील कौशल्य दाखवून द्यावे. अविचाराने पैसे गुंतवू नका.
▪️कन्या : दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. घरातील कुरबुरीमध्ये लक्ष घाला. स्थावरच्या कामाला गती येईल.

▪️तूळ : खंबीरपणे निर्णय घ्यावेत. कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल.
▪️वृश्चिक : वाद विवादात भाग घेणे टाळा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. लहरीपणे वागू नये. गरज असेल तेंव्हाच उदारपणे वागा.
▪️धनू : ध्येयवादी दृष्टिकोन बाळगाल. आपलाच हेका पूर्ण करण्यावर भर द्याल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. उष्णतेचे विकार संभवतात.

▪️मकर : शांततेचा मार्ग स्वीकारावा. धार्मिक स्थळांना भेट द्याल. ध्यान धारणेसाठी वेळ काढा. सामाजिक बांधीलकी जपावी.
▪️कुंभ : खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. श्रम वाढण्याची शक्यता आहे. गप्पांमधून नवीन माहिती मिळवाल. मित्रांशी वाद घालणे टाळा.
▪️मीन : सर्वांशी गोडीने वागाल. आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढाल. कामातील बदलांकडे दूर दृष्टीने पहावे. घरगुती कामात वेळ जाईल.