Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸17 मार्च 2022

0

▪️मेष : दिवस मनाजोगा व्यतीत कराल. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. कमिशनमधून कमाई कराल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.

▪️वृषभ : जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. घरात अधिकारी व्यक्तींची ऊठबस होईल. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात.
▪️मिथुन : अवास्तव अपेक्षा मनात बाळगू नका. मतभेदापासून दूर रहा. भागीदारीत सलोख्याचे वातावरण ठेवावे. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो.
▪️कर्क : हाताखालील लोकांची उत्तम साथ मिळेल. कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नका. परोपकाराची जाणीव ठेवावी. नातेवाईकांना सढळ हाताने मदत कराल.
▪️सिंह : बौद्धिक छंद जोपासाल. विलंबावर मात करावी. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. कामाची अचूक दखल घेतली जाईल.
▪️कन्या : छुप्या शत्रूंवर विजय मिळवता येईल. विरोधकांची तोंडे बंद होतील. मुलांचे साहस वाढेल. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.
▪️तूळ : बौद्धिक ताण जाणवेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. प्रेम सौख्यात वाढ होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल.
▪️वृश्चिक : मित्रांचा गोतावळा जमवाल. कौटुंबिक जबाबदारी वाढीस लागेल. खर्चाला आवर घालावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.
▪️धनू : सरकारी कामे वेळेत पूर्ण करता येतील. काही गोष्टींचा पुनर्विचार करावा. प्रगतीला योग्य दिशा मिळेल. हातून चांगले लिखाण होईल.
▪️मकर : धाडसी शब्द वापराल. अति चिकित्सा करू नका. चिकाटी सोडून चालणार नाही. जबाबदारी योग्यप्रकारे हाताळावी.
▪️कुंभ : फार हट्टीपणा करू नका. कामात तत्परता दाखवावी. गोष्टी चटकन लक्षात घ्याल. धूर्तपणे वागण्याकडे कल राहील.
▪️मीन : प्रवासाची आवड पूर्ण होईल. कागदपत्रांची योग्य छानणी करावी. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. गूढ गोष्टींकडे ओढ वाढेल.
Leave A Reply

Your email address will not be published.