Take a fresh look at your lifestyle.

खारवाडी शाळेला जलशुद्धीकरण यंत्र भेट !

माजी विद्यार्थ्याचाही केला सन्मान.

पारनेर : खारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्वर्गीय दशरथ अहिल्याजी भालेराव व स्वर्गीय शकुंतला दशरथ भालेराव यांच्या स्मरणार्थ श्री.चंद्रकांत भालेराव, शशिकांत भालेराव व राजेंद्र भालेराव या बंधूनी जलशुद्धीकरण यंत्र भेट दिले . त्याचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला . तसेच वाघवाडी येथील शाळेतील माजी विद्यार्थी ऋषिकेश विलास वाघ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा सत्कार सुवालाल शेठ पोखरणा यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाळवणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री .गांगर्डे साहेब ,ढवळपुरी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भालेराव ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सुप्रिया गौतम भालेराव, रोहिदास भालेराव, काशिनाथ जाधव साहेब ,शिवाजी जाधव, भीमराव भालेराव, चिमाजी भालेराव, रभाजी सतीश भालेराव, गणेश कादर शेख व समस्थ खारवाडी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते मुख्याध्यापक श्री.रमेश झावरे सर व बाळासाहेब रोहोकले सर इत्यादी उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. झावरे सर यांनी केले सूत्रसंचालन श्री. दादासाहेब वाघ यांनी केले.आभार श्री .रोहोकले सर यांनी मानले