Take a fresh look at your lifestyle.

‘ही’ मुलगी स्वत:चेच केस खाते; डॉक्टरही हैराण!

'सिटी' स्कॅन केल्यानंतर समजली अशी गोष्ट की...

 

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौमधील एका लहान मुलीबाबत एक विचित्र आरोग्यविषयक घटना समोर आली आहे. त्यानंतर डॉक्टरांनी या मुलीवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून तब्बल 2 किलोची गाठ काढली आहे.

त्याचे झाले असे कि, ही मुलगी गेल्या 2 वर्षांपासून अशक्त झाली होती. तिला नेमका काय आजार झालाय? याचं निदान होत नव्हतं. तिला केसगळतीचीही समस्या होती. काही दिवसांपूर्वी या मुलीला पोटदुखी आणि उलटीचा त्रास झाल्याने बलरामपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयातील सर्जरी विभागाचे डॉ. एस.आर. समदार यांनी तिची तपासणी केली.

सोनोग्राफी केल्यावर तिच्या पोटात गाठ दिसली. त्यानंतर सीटी स्कॅन केला असता ही गाठ मोठी असल्याचे लक्षात आले. त्यानुसार या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया सुमारे दीड तास चालली. शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातून केसांचा मोठा पुंजका बाहेर काढला गेला. पोटात केसाच्या पुंजक्याचं रूपांतर गाठीत झालं होतं. त्यामुळे हळू-हळू छोट्या आतड्याजवळचा मार्ग बंद होऊ लागला होता.

या शस्त्रक्रियेनंतर सदर मुलीची पोटदुखी आणि अन्य समस्याही दूर झाल्या आहेत. या मुलीच्या आजारावरुन हे स्पष्ट होतं कि, एखादी चुकीची सवय आरोग्यास किती घातक ठरू शकते. त्यामुळे पालकांनी अशा गोष्टींकडं वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे.

ट्रायकोबेजॉर हा विचित्र आजार आहे. या आजाराने ग्रस्त व्यक्ती स्वतःचे केस तोडून खाते. वैद्यकीय परिभाषेत या ला ट्रायकोबेजॉर म्हणतात. हा एक दुर्मीळ आणि गुंतागुंताची आजार आहे. मानवी शरीरशास्त्रानुसार पोटात केसाचे पचन होऊ शकत नसल्याने पोटात केस जमा होऊ लागतात. यावर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असतो. या आजाराने ग्रस्त रुग्ण मानसिक विकारानेही ग्रस्त असतात. यामुळेच ते स्वतःचे केस खातात.

– डॉ.एस.आर.समदार