Take a fresh look at your lifestyle.

नांदूरकरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच कोटयावधीचा निधी !

आमदार निलेश लंके यांचे प्रतिपादन.

पारनेर : नांदूर पठार गावामध्ये विविध राजकीय मतभेद असले तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व गटतट विसरून हे गाव आपल्यासाठी एक झाले होते गावकऱ्यांनी प्रचारासाठीही मोठे कष्ट घेतल्याने या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण नांदूर पठारला मोठ्या प्रमाणात निधी दिला असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
नांदूर पठार येथील ३ कोटी ७६ लाख ४८ हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार लंके यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.पारनेर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय औटी,अर्जुन भालेकर,नगरसेवक योगेश मते,भूषण शेलार,विजय डोळ, अमित जाधव,महेंद्र मगर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार लंके म्हणाले की, एकाचवेळेस कोटयावधी रूपयांच्या कामाचा शुभारंभ होत असल्याने नांदूर पठारकरांसाठी सुवर्ण अक्षरात लिहिवा असा हा आजचा दिवस आहे.या गावासाठी सुपा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या माध्यमातूनही आपण निधी दिला आहे.गेल्या १५ वर्षात या गावाला ५० लाखांपेक्षा जास्त निधी मिळाला नसेल परंतु आपण दोन वर्षात कोटीत निधी दिल्याचेही आ.लंके म्हणाले.
भविष्यात देखील या गावाला मोठया प्रमाणात निधी देऊन सर्व कामे पूर्णत्वास नेणार आहे मात्र, आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपण चांगल्या प्रकारे साथ देताल अशी अपेक्षा व्यक्त करीत नाबार्डच्या माध्यमातूनही निधी मिळणार असून हे गाव सुजलाम सुफलाम होईल.माझ्या आमदारकीच्या पदाचा फायदा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत झाला पाहिजे या भावनेने काम करीत असतो.संपूर्ण मतदारसंघात भरीव विकासकामे करायची आहेत. सर्वच गावं समृद्ध झाली पाहिजेत, त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणूकीत आपल्या विचारांचे उमेदवार निवडून दिल्यास आणखी कामे करायला संधी मिळेल असेही आ. लंके यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र चौधरी,बापू शिर्के,राहुल झावरे, कारभारी पोटघन मेजर,प्रकाश गाजरे,शिवाजी शिंदे,बापू ठुबे,बाळासाहेब खिलारी,चंदू ठुबे,सुरेश आंग्रे,बाळासाहेब लंके,अरुण पवार, शिवाजी व्यवहारे,पियूष गाजरे,पोपट गुंड,अजित भाईक,हरिभाऊ देशमाने,रवींद्र राजदेव,सुनील राजदेव,नारायण आंग्रे,शशिकांत आंग्रे,शिवाजी दिवेकर,तंटा मुक्तीचे अध्यक्ष दत्ता चौधरी, मदन देशमाने, तालुक्यातील अनेक गावचे सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.