Take a fresh look at your lifestyle.

एका वर एक फ्री… ऑफरचं नक्की गणित कसं असतं?   

चला तर या ऑफरची सत्यता जाणून घेवू !

 

ग्राहकांना आकर्षित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ‘एका वर एक फ्री’ किंवा अमुक वर तमुक फ्री ऑफर.. मात्र तुमच्या मनामध्ये हा प्रश्‍न नक्की निर्माण झाला असेल की, या लोकांना एकावर एक वस्तू फ्री देणं कसं काय परवडतं? यामागे त्यांचा काय हेतू असतो? चला तर मग आज या ऑफरमागची सत्यता नक्की काय असते?
▪️ या ऑफरची सगळ्या पहिली खासियत म्हणजे ग्राहकांना अतिरिक्त खरेदीस प्रवृत्त करणे. यामुळे ग्राहकवस्तू ग्राहक कोणताही विचार न करता खरेदी करतात.
▪️ अनेकदा या ऑफरमध्ये देण्यात येणार्‍या वस्तू वापरलेल्या असतात, तसेच कधी-कधी या वस्तू खराबसुद्धा असतात. सदर गोष्ट कपडे, शूज, अ‍ॅक्सेसरिजना मोठ्या प्रमाणात लागू होते.
▪️ या ऑफरमध्ये वस्तूंच्या किंमती खर्‍या किंमतीपेक्षा वाढवलेल्या असतात. उदा. एक टि-शर्टची किंमत 500 रुपये असेल तर तोच शर्ट बाय वन गेट वन फ्रीच्या ऑफरमध्ये 700 रुपयांना मिळतोय आणि सोबत दुसरा शर्ट फ्री मध्ये मिळतोय. यामध्ये ग्राहकाचे पैसे वाचत आहेत, असे आपल्याला वाटते. मात्र या ऑफरनुसार दुसरा शर्ट हा फुकट मिळाला पाहिजे होता, पण ग्राहक दुसर्‍या शर्टसाठी अतिरिक्त 200 रुपये देतोय.
▪️ या ऑफरमध्ये ग्राहकांनी किराणामाल खरेदी केला तर ग्राहकांना फायदा होऊ शकतो. कारण त्यांच्या किंमती विक्रेते वाढवू शकत नाही. मात्र मालाचा दर्जा नक्की पाहा.
▪️ या ऑफरच्या अटी व नियम लक्षात घ्या. या ऑफरमध्ये ग्राहकाने दोन्ही वस्तूच खरेदी करायला हव्यात असा काही नियम नाही. तो अर्ध्या किंमतीमध्ये एकच वस्तू देखील खरेदी करू शकतो. मात्र प्रत्येक दुकानदार ही गोष्ट तुम्हाला सांगेलच असं नाही किंवा असे करण्यास आडकाठीही करेल.
▪️ कधीही बाय वन गेट वन फ्री ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी ज्या वस्तूवर ती ऑफर आहे, त्याची किंमत बाजारात इतरत्र पहा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल.