Take a fresh look at your lifestyle.

धोत्रे खुर्द मधील महिलांचे कार्य कौतुकास्पद !

विशेष सरकारी वकील ॲड. मनिषा केळगंद्रे यांचे गौरोद्गार.

 

पारनेर : तालुक्यातील धोत्रे खुर्द व तुफानवस्ती या गावामधे कोरोना संकटाच्या काळात शिक्षणापेक्षाही जिवंत राहण्याचा प्रश्न मोठा होता , त्या काळात जीवावर उदार होवून गावातील ज्ञानदूत महिलांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गगार विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे यांनी काढले.
रिंकू सासवडे , सुनिता नाईकवाडी , दिपाली, भांड, मनिषा मंचरे, राजश्री तागड, मुक्ता बर्डे, गणेश पवार, धनेश कोळेकर यांनी वस्तीवर घरातील व घराशेजारील मुलांना अध्यापनाचे कार्य करून शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले . त्यामुळे या ज्ञानदूतांचा यावेळी सन्मान करण्यात आला ग्रामीण भागातील आपल्या कार्याचा पहिल्यांदाच होत असलेला सत्कार पाहून महिला भारावून गेल्या.या महिलांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरउद्गागार जिल्हा न्यायालयातील विशेष सरकारी वकील अँड मनिषा केळगंद्रे / शिंदे यांनी काढले.धोत्रे खुर्द व तुफानवस्ती या दोन्ही शाळेंना तीन लाख रुपये लोकसहभाग देणाऱ्या दानशूरांचाही सत्कार करण्यात करण्यात आला.
धोत्रे खुर्द व तुफानवस्ती या दोन्ही शाळा जिल्ह्यासाठी मॉडेलस्कूल आहेत.या शाळांना शिक्षकांनी भेटी देवून आदर्श घ्यावा , कुठल्याही शासकीय निधीची वाट न पाहता शाळेचा कायापालट केला आहे.लोकसहभागातून शाळा परिवर्तनात चारही शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी व्यक्त केले.
या आगळ्यावेगळ्या ज्ञानदूत व दानशूरांच्या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाळवणीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय बांडे होते . प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर पं.स.चे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे,सोनाली शिंदे , डॉ. वर्षा बांडे, डॉ. अपर्णा मेने , जयश्री तागड,सैनिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दिगंबर शेळके ,धोत्रे गावचे सरपंच वनिताताई कसबे , उपसरपंच राजू रोडे, ग्रा.पं सदस्य बाबासाहेब सासवडे ,योगिता राहिंज , पारूबाई भांड, तबाजी सासवडे गुरुजी, राजूशेठ भांड, काळकूप शाळेचे मुख्याध्यापक आबा चेमटे, आदिवासी एकता परिषदेचे सचिव सुनिलभाऊ गायकवाड , पंढरीनाथ तागड, बाळू नाईकवाडी , पप्पू गांगुर्डे, दत्तात्रय सासवडे , गोरक्ष नाईकवाडी, , पोपट सासवडे , शिवाजी मंचरे , सोपान गवते , संगिता, गवते संतोष आदमाने, अरुण राहींज सर, प्रमोद नाईकवाडी, उज्वला तागड, एकनाथ नाईकवाडी ,भास्कर तागड,पत्रकार सुचिता मोरे,संपादक विठ्ठल शिंदे ग्रामस्थ , महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जि.प.च्या शाळेत शिक्षण घेतलेले राजेंद्र कोळेकर याची पोलिस उपनिरीक्षक पदी व ऋषिकेश वाघ याची एमपीएससी तर्फे जलसंधारणमधे निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
शाळेतील चिमुरड्यांनी थोर महिलांची वेशभूषा सादरीकरण करुन उपस्थितांची विशेष दाद मिळवली.वेशभूषा सादरीकरणाचे सुत्रसंचलन इ. ३ री तील ओवी विशाल बर्वे व धनश्री बाळू नाईकवाडी या विद्यार्थीनींने केले यांचेही प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले.भारताची गाण कोकिळा लता मंगेशकर यांना गायनातून चारुशीला रायकर यांनी आदरांजली वाहिली .
श्रीमती प्रितम गलांडे व सचिन ठाणगे या शिक्षकांनी हस्तलिखित केलेली कार्यक्रमपत्रिका
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले . सुत्रसंचलन सचिन ठाणगे व प्रितम गलांडे यांनी केले व आभार एकनाथ कोरडे यांनी मानले.