Take a fresh look at your lifestyle.

…मात्र, ‘ते’ आय.ए.एस अधिकारी व्हावेत ही गावकऱ्यांची अपेक्षा !

उदय नांगरे यांचा गोरेगावकरांकडून सन्मान !

 

 

पारनेर : महापौर आदर्श शिक्षक पुरस्काराच्या माध्यमातून उदय नांगरे यांनी गोरेगावचे नाव मुंबईत झळकवण्याचे काम केले. मात्र, ते आय.ए.एस.अधिकारी व्हावेत अशी गावकऱ्यांची अपेक्षा असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी व्यक्त केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण नुकतेच झाले. तालुक्यातील मॉडेल व्हिलेज गोरेगावचे सुपुत्र उदय नांगरे यांना अत्यंत कमी वयात हा पुरस्कार मिळाला.त्यांचे गुणवत्ता पूर्ण काम आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांची निवड करण्यात आली.त्या निमित्त त्यांचा ग्रामपंचायत गोरेगाव व बाबासाहेब तांबे मित्र मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी तांबे बोलत होते.

गोरेगाव ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या नागरी सत्कार सोहळ्याला माजी सरपंच राजाराम नरसाळे,उपसरपंच पै.दादाभाऊ नरसाळे,पानमंद साहेब,ग्रामपंचायत सदस्य आण्णा पाटील नरसाळे,सोपान नांगरे,डॉ.धोंडिभाऊ तांबे,मंज्याबापू नरसाळे गुरुजी,मोरे गुरुजी,आप्पा पातारे उपस्थिती होते.

यावेळी बोलताना तांबे म्हणाले की,यांनी गोरेगावचं नाव मुंबईत झळकवण्याचं काम उदय केल्याचा आम्हास अभिमान आहे. मात्र,आम्ही गोरेगावकर त्यांच्याकडे आय ए एस अधिकारी म्हणून पाहत आहोत,मुलाखती मध्ये नगण्य गुणांवरून त्यांची संधी हुकली असली तरी ते भविष्यात अधिकारी म्हणूनच या सभागृहात सत्कार स्वीकारतील अशी आशा व्यक्त करीत त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन सर्वांनी गावाचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा युवक वर्गाकडून असल्याचेही तांबे म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना उदय नांगरे यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रथम माझ्या गावच्या लोकांनी प्रत्यक्ष भेटून,फोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला.श्री.बाबासाहेब तांबे मित्र मंडळ,दिशा फाऊंडेशनच्या सदस्यांनी सोशल मिडियावर गोरेगावचा अभिमान अशा आशयाच्या पोस्ट केल्या.माझ्या माणसांकडून होत असलेल्या कौतुकाने भारावून गेलो असे मत व्यक्त केले.पुरस्कार मिळणं ही प्रेरणा असली तरी ध्येय उच्च असलं पाहिजे अशी संकल्पना मांडली.मी नेहमी आपल्या ऋणात राहून गावच्या सामाजिक जडणघडणीत योगदान देत राहील अशी इच्छा व्यक्त केली.

कार्यक्रमासाठी विकास काकडे,अनिल पाटील नरसाळे,भाऊसाहेब तांबे,प्रदीप नरसाळे,युवराज नरसाळे,रमेश नरसाळे,वैभव नरसाळे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.