Take a fresh look at your lifestyle.

कोश शुद्धीकरण आणि संगत !

संगतीतुन आचारदोष कसे निर्माण होतात?

आनंदमय कोशजागृतीपर्यंत जाऊ शकलेल्या व्यक्तीला लिंगदेहाचे भान आपोआप कमी होऊन आत्मोत्थानाची जाणीव होईल. यालाच सुषुप्ती अवस्था म्हणतात.स्वप्नात जसं शरीर अडसर रहात नाही,तसं आनंदास्था प्राप्त झाली की मग शरीर विकार त्रास देत नाहीत.
आपण प्रापंचिक असल्या कारणाने शरीर नावाच्या भांड्याला स्वच्छ ठेवण्यासाठी खूप जपणे गरजेचे आहे. श्रीमंत होऊन जर सुवर्ण पात्रात दारुच पिणार असाल तर ती श्रीमंती काय कामाची?शरीर हे सुवर्णाहुनही किमती आहे. पंचकोशांनी ते भरलेलं आहे.
पंचकोश शुद्ध केले की हे भांड आतुन बाहेरुन स्वच्छ झालं म्हणून समजा.आता या भांड्यात काय घ्यायचं?हे फार विचारपूर्वक ठरवायची गरज रहाणार नाही. कारण आत्मोन्नतीने विवेक जागृती झालेलीच असते.तरीही भिती आहेच.कशाची?पुर्व संगतीची.आंतरिक शुद्धीकरण करण्यात यशस्वी झालेल्या व्यक्तीला स्वतःचे शुद्धाचार चोरीला जाणार नाही याची खूप खूप काळजी घ्यावी लागते.कारण तुम्ही कितीही चांगल्या विचारांनी प्रेरीत झालात आणि ते कर्म करायला निघालात आणि आपल्या सोबत चांडाळचौकडी असेल तर अपयश तर येईलच पण चुकिच्या संगतीने हे अनमोल कोशशुद्धीकरण वाया जाईल.
विवेक संगत चुकीच्या व्यक्तीची आहे की चांगल्या व्यक्तीची?याची जाणीव करुन देईल.पण पुर्व संबंध तोडायचे कसे?ते मोठे कौशल्याचे आणि मनोनिग्रहाचे काम आहे. त्यात अपयश आले तरी तुम्ही सर्व गमावल्यासारखेच आहे.
रामकृष्णहरी