Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्यात नोकरीची संधी तुमची वाट पाहतेय!

अर्ज करण्याची मुदत 6 एप्रिलपर्यंत

भारतीय लष्कराने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) साठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
रिक्त जागा – शॉर्ट सर्व्हिस कमिशन – एकूण 191 पदे (अविवाहित – 175 पदे,पुरुष – 14 पदे, अविवाहित महिला आणि संरक्षण कर्मचारी विधवा – 2 पदे)
निवड कशी होईल? : एसएसबी मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्ट सर्व्हिस कमिशन (तांत्रिक) कोर्स ऑक्टोबर 2022 पासून ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA), चेन्नई, तामिळनाडू येथे सुरू होण्याची शक्यता आहे.
पात्रता काय? : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी पदवी प्राप्त असावी.
वयोमर्यादा काय? : किमान वय 20 तर कमाल वय 27 वर्षे असावे.
स्टायपेंड किती? उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा 56 हजार 100 रुपये स्टायपेंड देखील दिला जाईल.
अर्ज करण्याची मुदत : 6 एप्रिल 2022 पर्यंत.
पात्र उमेदवार भारतीय लष्कराच्या वेबसाईट joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.