Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळाच्या दिवसात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

आजारांशी सामना करण्यासाठी नक्की वाचा!

ऋतू बदलल्याने अनेकदा विविध आजारांशी सामना करावा लागतो. मात्र असे काही आजार आहेत, जे उन्हाळ्यात डोके वर काढतात. हे आजार सामान्य वाट असले तरी वेळेवर उपचार न केल्यास ते घातक ठरू शकतात. यावर घरबसल्या उपचार करणे शक्य आहे. चला तर मग जाणून घेऊयात असे आजार टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करायला हवेत…
▪️ हीट स्ट्रोक (उष्माघात) : हा उन्हाळ्यातील सर्वात सामान्य आजार आहे, जो शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे होतो. हीट स्ट्रोक सामान्य मानला जात असला, तरी योग्य वेळी उपचार न केल्यास तो प्राणघातकही ठरू शकतो. हीट स्ट्रोक झाल्यास अन्नातून विषबाधा, ताप, पोटदुखी, उलट्या अशा समस्या डोके वर काढतात. त्यामुळे त्यावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. हीट स्ट्रोक टाळण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे आहाराची योग्य काळजी घेणे. विशेषतः उन्हाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर कमजोर होते. अशात, रोगांचा धोका वाढतो. त्यामुळेच उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या आणि हिरव्या भाज्या, सॅलड्स आणि फळांचे सेवन नक्कीच करा. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही, ज्यामुळे हीट स्ट्रोकचा धोकाही कमी होईल.
▪️ अ‍ॅसिडिटी : ही उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या आहे. अशात छातीत जळजळ आणि दुखणे, उलट्या झाल्यासारखे वाटणे अशा इतर समस्या देखील असतात. जेव्हा ही समस्या पुन्हा-पुन्हा उद्भवू लागते तेव्हा ती गंभीर समस्येचे रूप घेते. कालांतराने लोकांना हॉस्पिटलमध्ये देखील जावे लागते. हे टाळण्यासाठी अगोदरच सतर्क राहून अन्न सेवनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अ‍ॅसिडिटी टाळण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे तळलेले आणि मसालेदार पदार्थांचे सेवन. तसेच जेवणाची वेळ निश्चित करा आणि रोज वेळेवर अन्न खा. याशिवाय एनर्जी ड्रिंक व काढा करून त्याचे सेवन करावे होय.
▪️ कविळ : उन्हाळ्यात लहान मुले किंवा प्रौढ व्यक्तींना काविळीचा धोका अधिक असतो. काविळीचे सर्वात मोठे कारण म्हणजे दूषित पाणी आणि दूषित अन्न. काविळीमध्ये रुग्णाचे डोळे आणि नखे पिवळी पडतात तर लघवीचा रंगही पिवळा होतो. अशात योग्य उपचार न दिल्यास कावीळ गंभीर स्वरूप धारण करू शकते. म्हणून कावीळ झाल्यावर दूषित अन्न खाणे टाळा. तसेच तळलेले अन्न अजिबात खाऊ नका, शक्य असल्यास फक्त उकडलेले हलके अन्न खा. फक्त उकळलेले किंवा फिल्टर केलेलेच पाणी प्या.
▪️ कांजण्या येणे : विशेषतः उन्हाळ्याच्या सुरूवातीला कांजण्या येणे, असे प्रकार सुरु होतात. कांजण्या आल्यावर संपूर्ण शरीरावर लाल ठिपके पडतात. सोबतच खोकला, सर्दी, डोकेदुखी, ताप आणि घसा खवखवणे ही देखील त्याचीच लक्षणे आहेत. अशातआजूबाजूच्या लोकांमध्ये हा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यावर सावधगिरी हाच पहिला उपचार आहे. लहान मुले आणि तरुणांना याचा सर्वाधिक धोका असतो. कांजण्या टाळण्यासाठी लस दिली जाते.
▪️टीप : लेखात देण्यात आलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे, हे ध्यानात ठेवा!