Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर दर्शनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लोकनेता’ या विशेषांकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. नेते समर्थकांसह तालुक्याबरोबरच नगर,पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते,नागरिकांनी या विशेषांकाचे जोरदार स्वागत केले.
सर्वसामान्य कुटूंबातून पुढे आलेल्या आमदार निलेश लंके यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर अल्पावधीत मोठे लौकिक मिळविले.कोरोना काळात केलेल्या कामामुळे तर त्यांच्या नावाचा डंका केवळ राज्यातच नाही तर देशभरात वाजत आहे.सर्वसामान्यांच्या गळयातील ताईत बनलेल्या या लाडक्या लोकनेत्याच्या वाढदिवसाची कार्यकर्त्यांना काही महिने आधीच आतुरता लागून असते. हेच औचित्य साधून आ. लंके यांचा जीवनपट उलगडणारा ‘लोकनेता’ हा विशेषांक प्रकाशित करण्याचे योजिले होते.
‘पारनेर दर्शन’ च्या माध्यमातून पत्रकार विजय वाघमारे व पत्रकार देविदास आबूज यांनी सुमारे महिनाभरापासून या विशेषांकाची तयारी सुरू केली होती. अनेक सिद्धहस्त लेखकांचाही या कामी सहकार्य लाभले. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखविण्याचा संपादकीय मंडळाचा मानस होता आणि यातूनच ग्लेझ पेपरवरील तब्बल साठ पानांच्या दर्जेदार अंकाची निर्मिती झाली. वर्तमानपत्राच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग ठरला. या क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ मंडळींनी या विशेषांकाचे कौतुक केले.
Prev Post
Next Post