Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸11 मार्च 2022

▪️मेष : व्यापारात चांगला लाभ संभवतो. कामाची दगदग वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. क्षणिक आनंदाचा लाभ होईल.
▪️वृषभ : आर्थिक दर्जा सुधारेल. सर्वांना आनंदाने समजून घ्याल. नवीन मित्र जोडाल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात रूजेल.
▪️मिथुन : अति विचार करू नका. कलागुणांना चांगला वाव मिळेल. मनाजोगी खरेदी करता येईल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल.

▪️कर्क : चांगली कल्पनाशक्ति लाभेल. गायन, वादन कलेला चांगला प्रतिसाद मिळेल. शैक्षणिक कामात यश येईल. मनाची सहृदयता दाखवाल.
▪️सिंह : जोडीदाराची प्राप्ती वाढेल. वारसाहक्काची कामे करता येतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील.
▪️कन्या : मानसिक शांतता लाभेल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पित्तविकार बळावू शकतात. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.

▪️तूळ : मुलांशी जुळवून घ्यावे लागेल. साहित्याची आवड जोपासता येईल. घरातील कामात व्यग्र राहाल. घरातील स्वच्छता काढली जाईल.
▪️वृश्चिक : काही कामे खिळून पडतील. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक कार्यक्रम काढले जातील. लहान प्रवासाचा आनंद घ्याल.
▪️धनू : रागावर नियंत्रण ठेवावे. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. हातातील अधिकार वापरता येतील.

▪️मकर : हस्त कलेला उठाव मिळेल. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. डोळ्याची वेळोवेळी काळजी घ्यावी. गप्पांच्या ओघात जबाबदारी घेऊ नका.
▪️कुंभ : कमिशनच्या कामातून लाभ संभवतो. वेळेचे योग्य नियोजन करावे. अडथळ्यातून मार्ग काढावा. हजरजबाबीपणे वागाल.
▪️मीन : व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. फसवणुकीपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात पडू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.