Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती !

असा करा अर्ज!

बँक ऑफ बडोदाने रिस्क मॅनेजमेंट, एमएसएमई आणि कॉर्पोरेट क्रेडिट विभागांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान डिजिटल फ्रॉड मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर, क्रेडिट – एक्सपोर्ट/इम्पोर्ट बिझनेस आणि फॉरेक्स मॅनेजर, तसंच एक्विझिशन अँड रिलेशनशिप मॅनेजर या पदांसाठी सुमारे 105 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
मॅनेजर डिजिटल फ्रॉडसाठी 15, क्रेडिट अधिकारी (एमएसएमई विभाग) एसएमजी/एस IV साठी 15, तसंच क्रेडिट अधिकारी (एमएसएमई विभाग) एसएमजी/एस III साठी 25 जागांवर भरती होणार आहे. याशिवाय क्रेडिट – निर्यात / आयात व्यवस्थापन (एमएसएमई विभाग) एसएमजी/एसआयवीसाठी 8, क्रेडिट – निर्यात / आयात व्यवस्थापन (एमएसएमई विभाग) एसएमजी/एसआयआयसाठी 12, परकीय चलन – अधिग्रहण आणि संबंध व्यवस्थापक (कॉर्पोरेट क्रेडिट विभाग) MMG/SIII साठी 15, परकीय चलन – अधिग्रहण आणि संबंध व्यवस्थापक (कॉर्पोरेट क्रेडिट विभाग) एमएमजी/एसआयआयसाठी 15 जागांवर भरती केली जाईल.
ऑनलाईन अर्ज मुदत : 24 मार्चपर्यंत
वयोमर्यादा : 24 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंत (पदांनुसार)
अर्ज फी : आरक्षित श्रेणी पुरुष उमेदवार – 100 रुपये, अन्य श्रेणी पुरुष उमेदवार आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवार – 600 रुपये. परीक्षा शुल्क केवळ डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून भरता येऊ शकतं.
अधिकृत वेबसाईट : बँक ऑफ बडोदाच्या www.bankofbaroda.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या करिअर सेक्शनमध्ये जा. त्या ठिकाणी असलेल्या ऑनलाइन अप्लाय या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ‘Recruitment of Specialist Officers In Bank of Baroda’ वर क्लिक करा. आता आपल्याला हवं असलेल्या पदांनुसार रजिस्ट्रेशन करून अर्जासाठी आवश्यक शुल्क भरा.