Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸9 मार्च 2022

▪️मेष : क्षणिक गोष्टीने खट्टू होऊ नका. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
▪️वृषभ : मनातील गैरसमज बाजूला ठेवावेत. विचारांची दिशा बदलून पहावी. घरातील कामात रमून जाल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल.
▪️मिथुन : आरोग्याबाबत हयगय करू नका. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. उष्णतेचा त्रास जाणवेल.
▪️कर्क : मनातील अनामिक भीती बाजूला सारावी. हातातील कामात यश येईल. उगाचच कोणाशीही वादात अडकू नका. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा.
▪️सिंह : पोटाची काळजी घ्यावी लागेल. मुलांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. भागीदारीचा लाभ उठवावा.
▪️कन्या : जोडीदाराची उत्तम साथ राहील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे. नवीन वाहन खरेदीचा विचार मनात डोकावून जाईल.
▪️तूळ : कामाचे समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरावेत. हितशत्रूंचा त्रास कमी होईल.
▪️वृश्चिक : कामाची व्याप्ती वाढवता येईल. बोलतांना भान राखावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे.
▪️धनू : कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड करू नका. कौटुंबिक काळजी सतावत राहील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
▪️मकर : जवळचा प्रवास मजेत पार पडेल. जबाबदारी ओळखून वागावे. नवीन साहित्य वाचनात येईल. जमिनीच्या व्यवहारातून लाभ होईल.
▪️कुंभ : हट्टीपणा दूर सारावा लागेल. गप्पांची हौस पूर्ण करता येईल. चौकसपणा दाखवावा लागेल. आपले विचार उत्तमरीत्या मांडण्याचा प्रयत्न करावा.
▪️मीन : जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कागदपत्रे नीट तपासून पहावीत. प्रलोभनापासून दूर राहावे.